खूनप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा

By admin | Published: March 29, 2016 02:19 AM2016-03-29T02:19:23+5:302016-03-29T02:19:23+5:30

वरवट बकाल येथील घटना : खामगाव न्यायालयाचा निकाल.

The punishment for Ajnam imprisonment for murder | खूनप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा

खूनप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा

Next

खामगाव : पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या कारणावरून महिलेशी वाद घालत असताना समजावण्यास आलेल्या पतीचा गुप्तीने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल सोमवारी खामगाव न्यायालयाने दिला. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील रंजना गणेश इंगळे (वय ३0) हिने गावातीलच संगीत राजाराम इंगळे (वय ३९) याने, तू माझ्या घरासमोरुन का जाते, या कारणावरून चापट-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार तामगाव पोलीस स्टेशनला दिली होती. ही तक्रार पोलिसांनी अदखलपात्र ठेवली. तक्रार दिल्याच्या कारणावरून संगीतने चिडून रंजना इंगळे हिस विचारणा केली व बोलचाल करीत होता. यावेळी रंजना इंगळे हिचा पती गणेश मुकुंदा इंगळे वय ३५ हा समजावण्यास आला असता, संगीतने त्याच्या हातातील गुप्तीने गणेशच्या पोटावर व पाठीवर वार केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. गणेशवर गुप्तीने वार केल्यानंतर त्यास तत्काळ उपचारासाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. या तक्रारीवरून पोलिसांनी संगीत इंगळे याच्याविरुद्ध कलम ३0२, ३0७, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती. तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान, २५ जानेवारी २0१२ रोजी जखमी असलेला गणेश इंगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी सोमवारी खामगाव न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये १४ साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: The punishment for Ajnam imprisonment for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.