कार्यकर्त्यांनो कामाला लागा - महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:59 PM2019-06-21T14:59:22+5:302019-06-21T14:59:30+5:30

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

party worker prepare for election - Mahadev Jankar | कार्यकर्त्यांनो कामाला लागा - महादेव जानकर

कार्यकर्त्यांनो कामाला लागा - महादेव जानकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : आपल्याला सत्तेसोबत राहायचे असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेद्वार निवडूण आणावयाचे आहेत. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. मलकापुरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आपण कार्यकर्त्याला सक्षम बनविण्यासाठी सदैव तत्पर आहेत. पक्षाला कलंक लागेल, असे कोणतेही काम कार्यकर्त्यांनी करू नये. दरमयान मेळाव्यात धनगर समाजाला १ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मिळवून दिल्याबद्दल जानकर यांचा सत्कार करण्यात आला. रासपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा सादर करत स्वयंरोजगाराच्या बाबतीत मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक रासपचे चिखली तालुकाध्यक्ष भरत जोगदंडे यांनी तर संचालन गोपाल काटे यांनी केले.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य विठ्ठल गिरवळकर, जिल्हा उपाध्यक्षा धनश्री काटीकर, जिल्हाध्यक्ष गजानन गरूड, प्रदेश सदस्य भगवान बावणे, विदर्भ अध्यक्ष अनिल जगताप, युवक जिल्हाध्यक्ष अमोल काकडे, गजानन वरखेडे, बबन तायडे, प्रा. प्रकाश थाटे, भरत वानखेडे, मनोज जाधव, सय्यद ताहेर, ख्वाजा कुरेशी हैदर खान, यासिर शेख, निलेश बोरसे, शिवदास सोनवणे, गजानन मोरे, अंबादास आखाडे, मनोज जाधव, गणेश नेमाडे आदींसह रासपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याचे आभार प्रदर्शन करणसिंग सिरसवाल यांनी केले. मेळाव्यानंतर ना. जानकर यांनी शहीद संजय सिंग राजपूत यांच्या स्मारकास भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
 

Web Title: party worker prepare for election - Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.