मेहकरातील सामूहिक विवाह सोहळ्य़ांची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:16 AM2018-02-07T00:16:00+5:302018-02-07T00:16:25+5:30

मेहकर: तालुक्यात मागील वर्षात अनेक गावांमध्ये सामूहिक विवाह सोहळे पार पडले; परंतु सामूहिक विवाहासाठी मिळालेले अनुदान पात्र लाभार्थींनाच मिळाले की नाही, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्याची चौकशी होणार आहे. तसेच बोगस विवाह सोहळे करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सामूहिक विवाहाचे अनुदान हडपणार्‍यांना चाप बसणार आहे. 

Mahakat mass marriages will be investigated! | मेहकरातील सामूहिक विवाह सोहळ्य़ांची होणार चौकशी!

मेहकरातील सामूहिक विवाह सोहळ्य़ांची होणार चौकशी!

Next
ठळक मुद्देअनुदान लाटणार्‍यांना बसणार चाप!

उध्दव फंगाळ । 
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: तालुक्यात मागील वर्षात अनेक गावांमध्ये सामूहिक विवाह सोहळे पार पडले; परंतु सामूहिक विवाहासाठी मिळालेले अनुदान पात्र लाभार्थींनाच मिळाले की नाही, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्याची चौकशी होणार आहे. तसेच बोगस विवाह सोहळे करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सामूहिक विवाहाचे अनुदान हडपणार्‍यांना चाप बसणार आहे. 
काही वर्षामध्ये अतवृष्टी, पावसाच्या कमी प्रमाणामुळे पिकांच्या उत्पादनात घट, पिकांना बाजारात भाव नसने, मजुरांना कामे न मिळणे यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता हैराण आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई अशा परिस्थितीत आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी अनेक गोर-गरीब व्याजाने पैसे घेऊन बँकेचे कर्ज काढून शेती विकून लग्न लावत होते. मुला-मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड गोर-गरिबांकडून वेळेवर होत नसल्यामुळे अनेकांनी आत्महत्याचा मार्ग अवलंबला होता. अशा परिस्थितीत गोर-गरीब नागरिकांना व शेतकर्‍यांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून या सोहळ्याती वधू-वरांना शासनाकडून अनुदान देण्यात येते, तर ज्या संस्थेने सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असेल, त्या संस्थेलासुद्धा आर्थिक मदत देण्यात येते; मात्र अलीकडच्या काळामध्ये अनेकांनी बोगस सामूहिक विवाह सोहळे घेऊन संबंधित अधिकार्‍यांना हाताशी धरून शासनाचे लाखो रुपये अनुदान लाटले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत; मात्र आता मेहकर तालुक्यात झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यांची जिल्हा महिला बाल विकास विभागामार्फत चौकशी करण्यात येणार असून, बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणार्‍यावर कडक कारवाई होणार आहे, तसेच पात्र व खर्‍या लाभार्थींलाच लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रमोद एन्डोले यांनी दिली आहे.

या ठिकाणचे सोहळे चौकशीच्या फेर्‍यात 
मेहकर तालुक्यात १४ जुलै २0१७ रोजी सोनारगव्हाण, २२ जुलै २0१७ चिंचाली बोरे, २४ जून २0१७ रोजी हिवरा आश्रम ७ जुलै २0१७ रोजी नांद्रा-नजीक वर्दडी, ३0 मे २0१७ रोजी फ र्दापूर या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते. या सर्व सामूहिक सोहळ्याची जिल्हा महिला बाल विकास विभागामार्फत चौकशी होणार असून, चौकशी झाल्यानंतर जे खरे व पात्र वधू-वर असतील त्यांनाच शासनाचे अनुदान देण्यात येणार आहे, तर चौकशीअंती कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

ज्या संस्थांनी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले असतील व ज्या सामूहिक विवाह सोहळ्यात ज्या वधू-वरांनी लग्न केले असतील त्या सर्वांची चौकशी होऊन खर्‍या व पात्र लाभार्थींना शासनाचे अनुदान देण्यात येईल, तसेच दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- प्रमोद एन्डोले
जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, बुलडाणा

Web Title: Mahakat mass marriages will be investigated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.