मेहकर येथे स्वच्छतेसाठी निघाली महिलांची महारॅली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:08 AM2017-12-23T00:08:09+5:302017-12-23T00:08:44+5:30

मेहकर: नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’साठी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती तथा उपक्रम राबविणे सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ या मोहिमेत मेहकर नगरपालिकेने सहभाग घेतला असून, मेहकरवासीयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २१ डिसेंबर रोजी शहरातील महिला बचत गटाच्या वतीने महारॅली काढून जनजागृती करण्यात आली.

Mahakaris for the cleanliness of Mehkar! | मेहकर येथे स्वच्छतेसाठी निघाली महिलांची महारॅली! 

मेहकर येथे स्वच्छतेसाठी निघाली महिलांची महारॅली! 

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छता जनजागृतीसाठी महिला बचत गटाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’साठी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती तथा उपक्रम राबविणे सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ या मोहिमेत मेहकर नगरपालिकेने सहभाग घेतला असून, मेहकरवासीयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २१ डिसेंबर रोजी शहरातील महिला बचत गटाच्या वतीने  महारॅली काढून जनजागृती करण्यात आली.
मेहकर शहर स्वच्छ व सुंदर झाले पाहिजे यासाठी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, न.पा. उपाध्यक्ष जयचंद बाठिया मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पृष्ठभूमीवर स्वच्छ  सर्वेक्षण २0१८ अंतर्गत मेहकर नगरपालिकेने या उपक्रमात सहभाग घेतला असून, जानेवारीमध्ये मेहकर शहराचे नगर परिषदेच्या  वर्गानुसार मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ  सर्वेक्षण समिती मेहकर येथे येणार आहे. या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगरपालिका अंतर्गत येणार्‍या महिला बचत गटाच्या वतीने शहरातून वेगवेगळ्या वार्डातून महारॅली काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी रमेश उतपुरे, रतन शिरपूरकर, प्रकाश सौभागे, जावेद गवळी, शेख जफर, प्रमोद पाटील, सारिका कानडजे, गीता चोपडे, वैशाली गाभणे आदी उपस्थित होते.

Web Title: Mahakaris for the cleanliness of Mehkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.