जिल्हाभर धुमाकूळ घालणारे चोरटे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:56 AM2017-07-27T01:56:36+5:302017-07-27T01:56:44+5:30

बुलडाणा : शेगावमध्ये दोन ठिकाणी आणि लोणारमध्ये एका ठिकाणी तसेच उंद्री येथून मोटारसायकल चोरणाºया वेगवेगळ्या घटनांमधील पाच अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

jailahaabhara-dhaumaakauula-ghaalanaarae-caoratae-atakaeta | जिल्हाभर धुमाकूळ घालणारे चोरटे अटकेत

जिल्हाभर धुमाकूळ घालणारे चोरटे अटकेत

Next
ठळक मुद्देपाच ताब्यात, तीन लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेगावमध्ये दोन ठिकाणी आणि लोणारमध्ये एका ठिकाणी तसेच उंद्री येथून मोटारसायकल चोरणाºया वेगवेगळ्या घटनांमधील पाच अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्यांकडून दागिणे, घड्याळ, मोटारसायकल असा एकूण तीन लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
गत काही दिवसांपूर्वी शेगाव येथील रोकडिया नगर आणि व्यंकटेश नगरमध्ये एकाच दिवशी घरफोडी करण्यात आली होती. शिवाय लोणार शहरातही एक घर फोडण्यात आले होते. या घरफोडींमधील आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरट्यांची शहानिशा करून खबºयांना माहिती देण्यात आली होती. एपीआय विनायक कोरेगावकर यांच्या नेतृत्वातील पथक यावर काम करीत असतानाच घरफोडीचे आरोपी गावात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर चिखली आणि मेहकर शहरातून एक तर दुसरबीडमधून दोन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने साथीदारांची माहिती दिली. अकोला येथील कारागृहात असलेल्या या साथीदारालाही कायदेशीर प्रक्रियेतून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दर्शना भुरभुर भोसले रा.पारडी ता.मेहकर, राजू तुळशीराम पवार रा. दुसरबीड, ता.सिंदखेडराजा, राजू ऊर्फ शिवानंद दिलीप पवार रा.जऊळका, लहू दगडू धंदरे रा. जऊळका ता. सिंदखेडराजा आणि शिवानंद बबन पवार रा. दुसरबीड या पाच आरोपींकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये अंगठी, मणी मंगळसूत्र, डोरले, एकदाणी, कानातील वेल, रिंग, गोफ, सोन्याचे शिक्के आणि मनगटी घड्याळ हस्तगत करण्यात आले. अमडापूर येथे चोरलेली एक मोटारसायकलही आरोपींकडून मिळाली. एकूण तीन लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोल्ीास अधीक्षक संदीप डोईफोडे, पीआय प्रताप शिकारे यांच्या सुचनेनुसार एलसीबीच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

Web Title: jailahaabhara-dhaumaakauula-ghaalanaarae-caoratae-atakaeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.