दीड हजारांवर तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:08 AM2017-08-10T00:08:28+5:302017-08-10T00:09:16+5:30

मेहकर :  तालुक्यात जवळपास १७३0 तणावग्रस्त शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांना तणावग्रस्त असल्याचे कार्डसुद्धा वाटप करण्यात आले आहे. मात्र, तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसून, शासनाच्या मदतीपासूनही हे शेतकरी वंचित आहेत. तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने तणावग्रस्त शेतकरी तणावातच वावरत आहेत.

Hundreds of thousands of stressed farmers neglected! | दीड हजारांवर तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष!

दीड हजारांवर तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष!

Next
ठळक मुद्देतणावग्रस्त शेतकर्‍यांची केवळ नोंदच तणावग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर :  तालुक्यात जवळपास १७३0 तणावग्रस्त शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांना तणावग्रस्त असल्याचे कार्डसुद्धा वाटप करण्यात आले आहे. मात्र, तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसून, शासनाच्या मदतीपासूनही हे शेतकरी वंचित आहेत. तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने तणावग्रस्त शेतकरी तणावातच वावरत आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. शेतकरी बँकांकडून, तर कधी सावकारांकडून कर्ज घेऊन बी-बियाणे खरेदी करून पेरणी करतात. पिकांच्या भरवशावर शेतकर्‍यांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन ठरलेले असते. मात्र, कमी पाऊस, तर कधी अतवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान होऊन पाहिजे त्या प्रमाणात पिकांचे उत्पादन होत नाही. कसे-बसे आलेल्या पिकांना बाजारात भाव नाही, त्यामुळे बँकेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, कसे फेडावे, मुलीचे लग्न कसे करावे, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या चिंतेत शेतकरी बांधव असतात. आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी तणावात वावरतात. अनेक शेतकरी हतबल होऊन आत्महत्येकडे वळतात. त्यामुळे तणावग्रस्त शेतकर्‍यांचा शोध घेऊन, त्यांना तणावमुक्त करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू होत्या. त्यानुसार मेहकर तालुक्यात जवळपास १७३0 तणावग्रस्त शेतकरी आढळून आले आहेत. यामध्ये अंजनी बु. मंडळातून १८६ शेतकरी, मेहकर मंडळातून १७७, डोणगाव मंडळातून ११८, लोणी गवळी मंडळातून १00, शेलगाव देशमुख मंडळातून १२४, वरवंड मंडळातून १६७, जानेफळ मंडळातून २00, नायगाव दत्तापूर मंडळातून २३२, देऊळगाव माळी मंडळातून २२१, तर हिवरा आश्रम मंडळातून २0५  शेतकरी याप्रमाणे १७३0 तणावग्रस्त शेतकरी आढळून आले. या शेतकर्‍यांना तणावग्रस्त असल्याचे कार्डसुद्धा वाटप करण्यात आले आहे. मात्र, या तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावमुक्त करण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणतीही जनजागृती करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच तणावग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडूनही अद्याप मदत देण्यात आली नाही. त्यामुळे हे तणावग्रस्त शेतकरी आजरोजीसुद्धा तणावातच वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.     

तणावग्रस्तांसाठी सात महिन्यापूर्वी झाली होती सभा
मेहकर तालुक्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांना मार्गदर्शन करुन त्यांना वेळोवेळी मदत करण्याच्या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी स्थानिक गजानन महाराज मंदिरावर जानेवारी महिन्यात सभा घेतली होती. परंतु त्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून या तणावग्रस्तांसाठी एकही सभा अथवा बैठक झाली नसल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले.

मेहकर तालुक्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्नावर तहसीलदारांशी चर्चा
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. पिकांना भाव नाही, कर्जाचा बोजा डोक्यावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. शेतकर्‍यांवर दरवर्षी अस्मानी संकट कोसळत असल्याने अनेक शेतकरी तणावातच वावरत आहेत. त्यामुळे तणावग्रस्त शेतकर्‍यांचा सर्व्हे करून, त्यांना तणावमुक्त करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, मेहकर तालुक्यातील बहुतांश तणावग्रस्त शेतकरी हे तणावातच वावरत आहेत. महसूल विभागाकडून तणावग्रस्तांसाठी जनजागृतीसंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. यासंदर्भात मधुकरराव गवई यांनी मेहकर येथील तहसीलदार संतोष काकडे यांच्याशी ९ ऑगस्ट रोजी तणावग्रस्त शेतकर्‍यांसंदर्भात चर्चा केली.

Web Title: Hundreds of thousands of stressed farmers neglected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.