पूल गेला वाहून! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:27 AM2017-09-21T00:27:48+5:302017-09-21T00:28:27+5:30

मेहकर: मेहकर ते चायगाव रस्त्यावर असलेला पूल  पावसामुळे वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला  आहे. त्यामुळे एसटी बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थी व  गावकर्‍यांचे हाल होत आहेत.

Gull the pool! | पूल गेला वाहून! 

पूल गेला वाहून! 

Next
ठळक मुद्देपुलावर खड्डे पडल्याने एसटी बस बंद विद्यार्थी, गावकर्‍यांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: मेहकर ते चायगाव रस्त्यावर असलेला पूल  पावसामुळे वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला  आहे. त्यामुळे एसटी बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थी व  गावकर्‍यांचे हाल होत आहेत.
मेहकर ते चायगाव रस्त्यावर कोल्हीच्या लवणाजवळ पूल  आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे हा पूल वाहून  गेला आहे. तर रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूल  पडल्याने या रस्त्यावरून होणार्‍या वाहतुकीस अडथळा  निर्माण झाला आहे. चायगाव, वर्दडी वैराळ, वडगाव माळी  या गावांना या रस्त्यावरूनच जावे लागते. पूल पडल्याने  वाहने व एसटी बस येत नसल्याने गावकरी व विद्यार्थ्यांचे  हाल होत आहेत. त्यामुळे सदर पूल तत्काळ दुरुस्त करावा.  अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा धनंजय देशमुख, नागेश  देशमुख, मुकेश देशमुख, संजय लाटे, भारत मोरे, हर्षल  देशमुख, मयूर सरोदे, पवन रहाटे, किशोर देशमुख, गोविंद  देशमुख, सूरज वाकोडे, आश्रुजी रहाटेसह शाळेच्या विद्या िर्थनीनिकिता मोरे, ऐश्‍वर्या मोरे, पल्लवी बच्छिरे, लक्ष्मी  बोरकर, नेहा मोरे,दीपाली मोरे, वैष्णी देशमुख आदींनी दिला  आहे. 

Web Title: Gull the pool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.