जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:31 PM2018-06-30T18:31:53+5:302018-06-30T18:33:58+5:30

खामगाव : ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जुलैच्या अंकात प्रकाशित केले. त्याची दखल शासनाने घेतली असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

 Expansion time for submission of validity certificate | जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

Next
ठळक मुद्दे११ वी तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जातीचे प्रमाणपत्रावरच आतापर्यंत प्रवेश दिल्या जायचे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका पत्राद्वारे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

- योगेश फरपट
खामगाव : ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जुलैच्या अंकात प्रकाशित केले. त्याची दखल शासनाने घेतली असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. प्रथम वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २५ आॅगस्ट तर थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २३ आॅगस्ट अशी मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर ११ वी तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जातीचे प्रमाणपत्रावरच आतापर्यंत प्रवेश दिल्या जायचे. मात्र २८ जून रोजी तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या पत्रानुसार राज्य सामाजिक प्रवेश प्रक्रिया कक्ष (महाराष्ट्र राज्य) मुंबई यांनी शासनाच्या २४ जून २०१८ रोजीच्या अध्यादेशानुसार अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निदेर्शीत केले आहे. खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी २८ जून म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या वेळेवर हा निर्णय घेतल्याने प्रवेश प्रक्रियाच वांध्यात सापडली होती. २४ जूनपासून प्रवेश सुरु झाले असून १६ जुलै ही प्रवेशाची शेवटची तारिख असल्याने पालकांना आपल्या मुलगा प्रवेशापासून वंचीत राहतो की काय, अशाप्रकारची चिंता लागली होती. या सर्व प्रकाराबाबत ‘लोकमत’ने ३० जूनच्या अंकात ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका पत्राद्वारे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यामध्ये प्रथम वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २५ आॅगस्ट तर थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २३ आॅगस्ट अशी मुदतवाढ दिल्याचे म्हटले आहे. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी शाळांनी जरी विद्यार्थ्यांना टी.सी. दिली असली तरी विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी अजार्साठी शिफारस करण्यात यावी. सोबतच मागील वर्षी शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना देण्यात यावे असे म्हटले आहे.

Web Title:  Expansion time for submission of validity certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.