बुलडाणा जिल्ह्यात शेकडो युवकांच्या हाताला मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:28 PM2017-11-17T14:28:32+5:302017-11-17T14:30:24+5:30

बुलडाणा : राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झाले सुरू असून योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ७०९ युवक कौशल्य विकास साधत रोजगाराला लागले आहेत.

Employment in hundreds of youths in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात शेकडो युवकांच्या हाताला मिळाला रोजगार

बुलडाणा जिल्ह्यात शेकडो युवकांच्या हाताला मिळाला रोजगार

Next
ठळक मुद्दे नागरी जीवन्नोनती अभियान २ हजार ६२४ युवक घेतायेत प्रशिक्षण


बुलडाणा : राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झाले सुरू असून योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ७०९ युवक कौशल्य विकास साधत रोजगाराला लागले आहेत.
   जिल्ह्यात विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाºया संस्थांच्या माध्यमातून २ हजार ६२४ तरूण प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानातंर्गत २ हजार १३९ तरूणांना आणि राष्ट्रीय नागरी जीवनोन्नती अभियानातंर्गत ४२५ तरूणांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. यामध्ये गारमेंट, आॅटोमोबाईकल, ब्युटी पार्लर, बांधकाम, इलेक्ट्रिकल, वेल्डींग, आदिरातिथ्य, संगणक व टर्नींग व्यवसायांचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण जवळपास ५४ बॅचेसमध्ये सुरू आहेत.  प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुशिक्षीत बेरोजगार तरूणाला प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्रावर तरूणांना रोजगार मिळण्यास किंवा स्वत: व्यवसाय थाटण्यामध्ये सहजता मिळते. जिल्हाभरात योजना सुरू झाल्यापासून ७०९  सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना रोजगार मिळाला आहे. या तरूणांनी जिल्ह्यात २४ बॅचेसमधून प्रशिक्षण पूर्ण केले. व्यवसायानुसार इलेक्ट्रीक व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण करणारे २०५ तरूण असून बांधकाम व्यवसाया प्रशिक्षीत होणारे ५४ तरूण आहेत. राष्ट्रीय नागरी जीवन्नोनती अभियानाद्वारे प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार मिळविणारे ३० तरूण आहे. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानानुसार ६७९ तरूणांच्या हाताला काम मिळाले आहे. भारत जगातील सर्वाधिक तरूणांचा देश असल्यामुळे येथील तरूण देशाचे भवितव्य ठरविणारे आहे. त्यांचे त्यांना हव्या असलेल्या क्षेत्रामध्ये  कौशल्य विकसीत करून त्यांना देशाच्या विकासात सहभागी करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर वेळोवेळी होत आहे. त्यामुळे कौशल्य विकास हा विभागाचे राज्य शासनाने स्वतंत्र बनविला आहे. या विभागाच्या माध्यमातून केवळ तरूणांचे कौशल्यवर्धन करण्यात येत नाही, तर त्यांना रोजगार मेळाव्यांच्या माधमातून रोजगारही मिळवून दिला जात आहे.
   

संगणक प्रशिक्षणामध्ये 330 तरूणांना रोजगार

जिल्ह्यातही विविध रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील कंपन्यामध्ये विविध पदांवर नोकरी देण्यात आली आहे. आदरातिथ्यसारख्या व्यवसायात प्रशिक्षित होवून हॉटेलींग करण्यामध्ये तरूणांचा कल वाढला आहे. विविध व्हीटीपीच्या माध्यमातून सदर कार्य जिल्ह्यात होत आहे. कौशल्य विकास साधत सुशिक्षीत तरूणांचा कल स्वयंरोजगाराकडे वाढला असून संगणक प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील ३३० तरूणांना रोजगार मिळाला आहे.

Web Title: Employment in hundreds of youths in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.