जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेस सेवादलाचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:21 AM2017-11-23T00:21:50+5:302017-11-23T00:22:19+5:30

शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या  जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी  काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी  कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Congress office staged a protest against the office of the Collector! | जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेस सेवादलाचा मोर्चा!

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेस सेवादलाचा मोर्चा!

Next
ठळक मुद्देकोट्यवधींचा भ्रष्टाचार करणार्‍या ‘आरएफओ’वर कारवाईची मागणीजिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या  जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी  काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी  कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
स्थानिक गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर  काँग्रेस सेवादलाचे मोहन बाभुळकर, गौतम मोरे, अभय मोरे, प्रवीण गाडेकर,  तुळशीरावम नाईक, नीलेश हरकल, शेख मुजूभाई, शैलेश खेडेकर, अँड.विशाल गवई  आदींनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की,  जळगाव जामोद येथील आरएफओ कांबळे यांनी पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या  पैशाचा दुरूपयोग करून वरिष्ठ अधिकार्‍यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे.  याबाबत दखल घेऊन सोनाळा येथे शेतकर्‍याच्या शेतात पुरलेले अस्वल प्रकरण, सोनबर्डी  बिटमध्ये कुजलेले अस्वल आढळले, एकामागे एक तीन अस्वल कुजलेल्या अवस्थेत  सापडले, तरीसुद्धा कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे अस्वलाच्या अवयवांची तस्करी  झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मौजे मेढामारी कंपार्टमेंटमध्ये ३.७0 हे.आर. अ ितक्रमणाबाबत कारवाईस टाळाटाळ होत आहे. कंपार्टमेंट ६२१ मध्ये २0 मेंढपाळांचे  कुटुंब तीन हजार मेंढय़ांसह, जळगाव जामोद वनक्षेत्रात काठेवाडी गुरे दोन हजार गायी व  १0 कुटुंबे राहतात. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे नमूद केले  आहे. या मोर्चात जवळपास १५0 पेक्षा जास्त सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी  झाले होते. 

Web Title: Congress office staged a protest against the office of the Collector!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.