‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ लोकचळवळ व्हावी :  जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:20 AM2017-10-31T00:20:19+5:302017-10-31T00:21:04+5:30

बुलडाणा : येथील पर्यावरण मित्र ग्रुपच्या वतीने ‘जन्मदिनी वृक्ष  लावू अंगणी’ हा गेल्या दीड वर्षापासून सुरू करण्यात आलेला  उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाची लोकचळवळ व्हावी, अशी  अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त  केली.

The 'Birthday tree cutting Angle' should be a folk: Collector | ‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ लोकचळवळ व्हावी :  जिल्हाधिकारी

‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ लोकचळवळ व्हावी :  जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देदीड वर्षात जन्मदिनी लावण्यात आले सहा हजार झाडे

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथील पर्यावरण मित्र ग्रुपच्या वतीने ‘जन्मदिनी वृक्ष  लावू अंगणी’ हा गेल्या दीड वर्षापासून सुरू करण्यात आलेला  उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाची लोकचळवळ व्हावी, अशी  अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त  केली.
गेल्या दीड वर्षात या ग्रुपने शहरातील विविध प्रतिष्ठीत नागरिक,  मित्र मंडळींच्या जन्मदिनी तब्बल सहा हजार वृक्ष लावले आहे त. विशेष म्हणजे ज्यांचा जन्मदिन असतो त्याच्याच घराच्या  परिसरात हा कार्यक्रम होऊन जन्मदिन असलेला व्यक्तीच  लावलेल्या रोपाचे संगोपण करतो, ही अभिनव कल्पना आहे,  असे जिल्हाधिकारी म्हणाले. यामुळे प्रत्येकाचे लावलेल्या  झाडाशी एक भावनिक नाते निर्माण होते. पर्यावरणाच्या  समृद्धीसाठी ही एक महत्त्वाची उपलब्धी ठरू शकते, असे ते  म्हणाले.
शहरातील ९0 वर्षीय सुभेदार रामकृष्ण हरी सुरडकर आणि कॅ प्टन अशोक राऊत यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधून  जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण मित्र ग्रुपतर्फे वृक्षारोपण  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.  चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपरोक्त मत मांडले. २८ ऑ क्टोबरला हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान फणस ,  आंबा , जांभूळ , सीताफळ व आवळ्य़ाची पाच फळझाडे  जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले. माजी आमदार  विजयराज शिंदे, संजय हाडे, राजेंद्र काळे, तहसिलदार दिनेश  गिते, शंकर बैरवार, ओमसिंग राजपूत, पर्यावरण मित्र ग्रुपचे  चंद्रकांत काटकर, अनू माकोने, मुकुंद जोशी, जयंत दलाल,  करण येमले, नीलेश शिंदे, दीपक पाटील, मुकुंद वैष्णव, गो पालसिंग राजपूत, कल्पना माने, प्रिती यरमुले, श्रुती माने, दीपाली  सुसर, महेंद्र सौभागे, आनंद सुरडकर, अभिलाष चौबे, किरण  देशपांडे, तेजस देशमुख, सचिन देशलहरा, शाम ठाकूर, मंगेश  शिंगणे, राजेश जोशी, घनश्याम बेंडवाल उपस्थित होते.

Web Title: The 'Birthday tree cutting Angle' should be a folk: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.