बजेट म्हणजे काय रे भाऊ ?

By admin | Published: March 17, 2015 12:03 AM2015-03-17T00:03:49+5:302015-03-17T00:06:18+5:30

‘लोकमत’संगे जाणून घेऊ : सोप्या भाषेत जाणून घ्या

What is the budget? | बजेट म्हणजे काय रे भाऊ ?

बजेट म्हणजे काय रे भाऊ ?

Next

कोल्हापूर : कर कुणाच्या खिशाला हात घालतो, राज्याच्या अर्थव्यवस्थेत रुपया येतो कसा, जातो कसा, या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत जाणून घेण्याची संधी अर्थसंकल्प २०१५ करविषयक चर्चासत्रामध्ये नागरिकांना मिळणार आहेत. ‘लोकमत’तर्फे कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात गुरुवारी (दि. १९) सायंकाळी साडेचार वाजता हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात सी. ए. उमेश शर्मा मार्गदर्शन करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प उद्या, बुधवारी सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र होत आहे. अर्थसंकल्प म्हटले की, सर्वसामान्यांच्या दृष्टीने महागाई एवढाच विषय असतो; पण या अर्थसंकल्पाशी संबंधित कररचना, राज्य आणि केंद्र सरकार अर्थसंकल्प संबंध, आर्थिक वृद्धी, गुंतवणूक, बँकांचे व्याजदर, राज्यातील नवीन शासकीय योजना अशा अनेक बाबी सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव टाकतात. या संकल्पना सहज आणि सोप्या भाषेत नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहेत.
सर्वसामान्य माणूस ज्या वस्तू विकत घेतो, त्यांची किंमत कशी ठरते, कर कुणी भरायचा असतो, एलबीटी म्हणजे काय, एलबीटीऐवजी येणारा जीएसटी कसा असेल, संपत्ती कर कुणी भरायचा, कोणत्या रकमेपर्यंतचे व्यवहार रोखीने करावेत, काळ्या पैशाचे व्यवहार रोखण्यासाठी चेकचा वापर कसा उपयुक्त आहे, परदेशी गुंतवणूक आणि देशाचा पर्यायाने राज्याचा विकास, राज्यांना केंद्राकडून मिळणारे अनुदान, कर रूपातील हिस्सा यांची माहिती सोदाहरण मिळणार आहे.
देशाचा अर्थसंकल्प सोप्या भाषेत जाणून घेण्याच्या या अनोख्या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. प्रवेशिका लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ७७९८३४४७४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: What is the budget?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.