ठळक मुद्देकाहींच्या मते ५०० सीसी ताकदीच्या स्कूटीसाठी हा नियम लागू केला जाण्याची शक्यता आहे१९९६ मध्ये १०० ते ५० सीसी क्षमतेच्या दुचाकींवर अशा प्रकारची बंदी आणण्याचा प्रस्ताव होतामोटरसायकलवरून एकावेळी सहकुटुंब, सहमित्र जाणाऱ्यांची संख्या कमी नाही

स्कूटर व मोटारसायकल यांची वाढणारी संख्या व त्यांचे वाढणारे अपघात यांचे प्रमाण पाहाता कर्नाटक सरकार आता नवा कायदा करण्याच्या विचारात आहे. ज्या नव्या स्कूटर्स अथा मोटारसायकल १०० सीसी क्षमतेच्या आतील आहेत, त्या दुचाकींवर केवळ ती चालवणाराच जाऊ शकेल, मागे बसण्यास अशा दुचाकीवर परवानगी नसेल. मात्र अ्शा प्रकारातल्या जुन्या दुचाकींवर मागे बसता येईल, असा निर्णय घेण्याचा विचार कर्नाटक सरकार करीत आहे. उत्पादकांनीही अशा प्रकारच्या १०० सीसी ताकदीपेक्षा कमी ताकदीच्या स्कूटर्स वा दुचाकी तयार करताना त्यांनी तेथे सिंगल सीटच फक्त द्यावी, याचीही आवश्यकता आहे. यासंबंधात सरकारने स्पष्टीकरण द्यावे म्हणून उच्च न्यायालयाने विचारणा केली आहे. एका अपघातप्रकरणी सुनावणीच्यावेळी कर्नाटकचे महसूल मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी उच्च न्यायालयाला या संबंधात प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल असे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या बंदीमुळे अनेक प्रवाशांचे व लोकांचे हाल होतील, असे मत व्यक्त केले जात आहे. तर काहींच्या मते ५०० सीसी ताकदीच्या स्कूटीसाठी हा नियम लागू केला जाण्याची शक्यता आहे. एका अहवालाच्या माहितीनुसार २५ टक्के दुचाकी या १०० सीसी क्षमतेच्या ताकदीपेक्षा कमी असून १९९६ मध्ये १०० ते ५० सीसी क्षमतेच्या दुचाकींवर अशा प्रकारची बंदी आणण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्याला विलंब झाला.

कर्नाटकच्या वाहतूक आयुक्तांच्या माहितीनुसार कर्नाटक मोटर वाहन नियमांच्या आधारे अलीकडेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची आम्ही अंलबजावणी करावी लागेल. त्यानुसार १०० सीसी ताकदीपेक्षा कमी ताकदीच्या दुचाकींवर मागे चालकामागे कोणीही बसू नये, त्याला पिलियन रायडर असे आपण संबोधतो, त्याला अशा कमी ताकदीच्या दुचाकीवर बसण्यास बंदी घालणारा हा नियम आहे. एकंदर पार्श्वभूमी पाहाता सरकारने १०० सीसी ऐवजी ५० सीसी क्षमतेच्या दुचाकीसंबंधात ही बंदी घालावी, यासाठी वाहतूक आयुक्तांकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, असे वाहतूक आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले.

वास्तविक आजची एकंदर देशातील स्थिती पाहाता एकंदर बाइक वा स्कूटरवरून १०० सीसी ते १२५ सीसी ताकदीच्या दुचाकींवरून मग त्या स्कूटर्स असोत वा मोटारसायकल असोत, त्यावरून एकावेळी सहकुटुंब, सहमित्र जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र कायद्याची भाषा त्यांना समजत नाही, कायदा झुगारून देण्याची वृत्ती वाढली आहे. तशात अपघात होणे व प्राण जाणे हे सर्वसाधारण झाले आहे. कारण असे अपघात होऊनही लोकांना त्याची जाण नसते, हेच दुर्दैव आहे. जोपर्यंत कायद्याचे पालन व दुचाकी वापरामधील गांभीर्य यांची कल्पना लोकांना येत नाही, तोपर्यंत अशा वाहतूक रचनेमध्ये अति कठोरपणाची गरज आहे, म्हणता येते. स्कूटर वा मोटारसायकलीच्या ताकदीपेक्षा जास्त प्रवासी नेणे चुकीचे आहे, याची समजच जर वापरकर्त्याला नसेल व आली असली तरी त्याचे वर्तन सुधारणार नसेल तर कायद्याला कठोर राबवावेच लागेल. केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे उल्लंघन सुरू आहे, याला केवळ कठोर अंमलजबजावणी हाच उपाय आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.