लसीकरणातून अंगणवाडीला डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:50 PM2018-01-17T23:50:11+5:302018-01-17T23:50:35+5:30

बालकांच्या लसीकरणासह त्यांचे आरोग्य विषयक उपक्रम अंगणवाडीत राबविण्यात येतात.

Vaccination was done to the anganwadi | लसीकरणातून अंगणवाडीला डावलले

लसीकरणातून अंगणवाडीला डावलले

Next
ठळक मुद्देगोंडीटोला येथील प्रकार : पल्स पोलिओ अभियानातून वगळले

आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : बालकांच्या लसीकरणासह त्यांचे आरोग्य विषयक उपक्रम अंगणवाडीत राबविण्यात येतात. परंतु या उपक्रमाला गोडीटोला गावात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिलांजली दिली आहे. यामुळे लसीकरणापासून अनेक बालके वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात समन्वय निर्माण करण्याची मागणी गावात होत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाचे बालक आणि महिलांचे कल्याणकारी उपक्रम अंगणवाडीचे माध्यमातून गावात राबविण्यात येत आहे. परंतु सध्या चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रतापाने या उपक्रमात अंगणवाडीला वगळण्यात आले आहे. या गावात २२ वर्षापासून अंगणवाडी क्रमांक १ आहे.
या अंगणवाडीत शासनाचे लसीकरण, पल्स पोलीओ तथा अन्य उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु १ सप्टेबर ७ आक्टोंबर या कालावधीत राज्यात अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप पुकारले होते. संप काळात अंगणवाडीला कुलूपबंद ठेवण्यात आल्या होत्या. सेविका संपावर गेल्याने लसीकरण मोहीम ग्राम पंचायत मध्ये राबविण्यात आली आहे.
परंतु नंतर संप संपल्यानंतर अंगणवाडी सेविका पूर्ववत कामावर रुजू झाल्या. अंगणवाडी सुरु झाले असतांना लसीकरणाचे अधिकार पूर्ववत पुन्हा वैद्यकीय अधिकाºयांनी बहाल केले नाही. पल्स पोलीओ अभियान संदर्भात १० जानेवारीला अंगणवाडी सेविकांनी बैठक घेतली. या बैठकीपासून अंगणवाडी सेविकेला वैद्यकीय अधिकाºयांनी दुर ठेवले आहे. १७ जोनवारीला बपेरा उपकेंद्र अंतर्गत लसीकरणाचे कार्य ग्रामपंचायत मध्ये घेतले. अंगणवाडी इमारत सुरु असतांना लसीकरण मोहीमेतून डावलले. लसीकरण मोहिमेची परपंरा अंगणवाडीत होत असल्याची माहिती गावकऱ्यांना आहे. या परंपरेत बदल करण्यात आल्याने लसीकरणापासून बालके वंचित राहण्याची शक्यता आहे. एकाच अंगणवाडी सोबत भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप आहे. यामुळे गावात असंतोष खदखदत आहे. ग्रामपंचायतमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. परिसरात असणाऱ्या अन्य अंगणवाडी सोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेदभाव व डच्चू देण्याचा प्रकार केला नाही. परंतु याच गावात हा भेदभाव वाढ वैद्यकीय अधिकारी निर्माण करीत असल्याची ओरड गावात सुरु झाली आहे. याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन गावावर झालेला अन्याय दुर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संप काळात अंगणवाडी इमारत कुलूप बंद होत्या. शासकीय इमारत असल्याने लसीकरण मोहिम करीता चाब्या दिल्या नाही. यामुळे ग्राम पंचायतमध्ये मोहिम राबविण्यात येत आहे.
-सी.जी. चौव्हान, वैद्यकीय अधिकारी,प्रा.आ.केंद्र, चुल्हाड.
लसीकरण व पल्स पोलीओ अभियानातून हेतुपुरस्सर अंगणवाडीला डावलण्यात येत आहे. २२ वर्षाच्या काळात हे पहिल्यांदा झाले आहे. हा अधिकार मिळाला पाहिजे.
-विंदा गोंडाने, अंगणवाडी सेविका, गोंडीटोला.
सेविकांच्या संप काळापासून ग्रामपंचायतमध्ये लसीकरण घेण्यात येत आहे. अंगणवाडी क्र.१ मध्ये ही मोहिम पुन्हा पुर्ववत सुरु करण्यासाठी प्रयत्न व समन्वय घडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
-नंदलाल राहांगडाले, सरपंच गोंडीटोला.

Web Title: Vaccination was done to the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.