अनियंत्रित ट्रक पुलावरुन कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:13 AM2018-03-16T01:13:52+5:302018-03-16T01:13:52+5:30

तुमसर- वाराशिवनी या राज्य मार्गावरील खैरलांजी गावाजवळ पुलावरुन ट्रक खाली कोसळला. सुदैवाने जिवीत हानी टळली. हा अपघात बुधवारी घडला. या पुलाचे आयुष्य संपले असूनही त्या पुलावरुन वाहतुक सुरुच आहे.

 Uncontrolled truck collapsed from the bridge | अनियंत्रित ट्रक पुलावरुन कोसळला

अनियंत्रित ट्रक पुलावरुन कोसळला

Next
ठळक मुद्देजीवितहानी टळली : खैरलांजी येथील घटना

ऑनलाईन लोकमत
तुमसर : तुमसर- वाराशिवनी या राज्य मार्गावरील खैरलांजी गावाजवळ पुलावरुन ट्रक खाली कोसळला. सुदैवाने जिवीत हानी टळली. हा अपघात बुधवारी घडला. या पुलाचे आयुष्य संपले असूनही त्या पुलावरुन वाहतुक सुरुच आहे.
या आंतरराज्यीय मार्गावर खैरलांजी गावाजवळ हा पुल असून दोन पुलांच्या मध्यभागी मोकळी जागा आहे. येथे नेहमीच अनेक अपघात झाले आहेत. बुधवारी एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाखाली कोसळला. प्रसंगावधान साधून ट्रक चालकाने उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला.
हा ब्रिटीशकालीन पुल असून सार्वजनिक बांधकाम खात्याने दुसरा पर्यायी पुल तयार केला आहे. पंरतु वाहन चालक जुन्याच पुलावरुन वाहतूक करीत असतात. वळणाच्या ठिकाणी हे दोन्ही पुल असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते. ब्रिटीशकालीन पुलावरुन वाहतुक बंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title:  Uncontrolled truck collapsed from the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.