खोदलेल्या रस्त्यावरून तुमसरकरांची जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:20 PM2019-03-19T21:20:34+5:302019-03-19T21:20:49+5:30

तुमसर शहरातील प्रमुख बावनकर चौक ते जुने बसस्थानक दरम्यान रस्ता पाच दिवसापूर्वी सिमेंट रस्ता बांधकामाकरीता खोदण्यात आला. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. या मार्गावरुन नागरिक जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. निवडणूक आचारसंहितेपूर्वी घाईगर्दीत रस्ता खोदकाम करण्यात आले, हे विशेष.

Traumatoners' life-threatening traffic from the excavated road | खोदलेल्या रस्त्यावरून तुमसरकरांची जीवघेणी वाहतूक

खोदलेल्या रस्त्यावरून तुमसरकरांची जीवघेणी वाहतूक

googlenewsNext
ठळक मुद्देसिमेंट रस्ता बांधकामाची गरज : बावनकर चौक ते जुन्या बसस्थानकादरम्यानचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहरातील प्रमुख बावनकर चौक ते जुने बसस्थानक दरम्यान रस्ता पाच दिवसापूर्वी सिमेंट रस्ता बांधकामाकरीता खोदण्यात आला. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. या मार्गावरुन नागरिक जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. निवडणूक आचारसंहितेपूर्वी घाईगर्दीत रस्ता खोदकाम करण्यात आले, हे विशेष.
बावनकर चौक ते जूने बसस्थानक चौक हा मेन रोड आहे. शहरातील प्रमुख चौक व रस्ता आहे. वर्दळीचा तथा शहरातील मुख्य बाजारात, नगरपालिकेत व इतर कार्यालयात जाणारा महत्वपूर्ण रस्ता आहे. सिमेंट रस्ता बांधकाम येथे दुसऱ्या टप्प्यात सुरु करण्यात आले. यापुर्वी रेल्वे फाटक ते गभने सभागृहापर्यंत सुमारे १२०० मीटर रस्ता सिमेंटीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वी सदर डामरी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूला लोखंडी आडवे कठडे लावण्यात आले. दरम्यान नागरिकांत विनोबा भावे बायपास रस्त्याने, बजाज नगरातून ये-जा करावे लागत आहे.
चार दिवसानंतर रस्ता बांधकामाकरीता संबंधित विभागाकडून काहीच हालचाल करण्यात आली नाही. लोखंडी कठडे रस्त्याच्या बाजूला करुन पुन्हा खड्डेमय, गिट्टीमय खोदकाम केलेल्या रस्त्यावरुन वाहतुक सुरु झाली. धोकादायक रस्त्याने येथे वाहतूक सुरु आहे. एकीकडे संपूर्ण रस्ता खोदकाम केल्यावर तात्काळ सिमेंटीकरण रस्ता बांधकामाला सुरुवात का करण्यात येत नाही. आता प्रश्न तुमसरकरांनी उपस्थित केला आहे. कासवगतीने कामे केली तर किमान तीन ते चार महिने येथे लागतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ता बांधकामाला सुमारे नऊ महिन्यांचा काळ लागला येथेही तीच स्थिती राहील काय! सदर रस्ता बांधकामावर मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियंत्रणात आहे. शहरातून रस्ता बांधकाम करतांनी संबंधित विभागाने निश्चितच नियोजन केले असावे. परंतु यापूर्वीचा अनुभव तुमसरकरांना चांगला आला नाही. किमान या खेपेला जलद गतीने सिमेंट रस्ता बांधकाम करावे अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Traumatoners' life-threatening traffic from the excavated road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.