हजारो क्विंटल धान्यसाठा उघड्यावर

By admin | Published: December 22, 2014 10:42 PM2014-12-22T22:42:26+5:302014-12-22T22:42:26+5:30

सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पिक आहे. या पिकांचे यंदा समाधानकारक उत्पादन झाले. या शेतीला चांदपुर जलाशयाने तारले आहे. यात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा सिहांचा वाटा आहे.

Thousands of quintal grains open | हजारो क्विंटल धान्यसाठा उघड्यावर

हजारो क्विंटल धान्यसाठा उघड्यावर

Next

सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पिक आहे. या पिकांचे यंदा समाधानकारक उत्पादन झाले. या शेतीला चांदपुर जलाशयाने तारले आहे. यात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा सिहांचा वाटा आहे. पाणी वाटपात पाटबंधारे विभागाचे कृती बध्द नियोजनमुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक धानाचे पिक घेतले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासकीय धान खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात आली आहे. चुल्हाड, वाहनी अशा केंद्रावर धानाची खरेदी सुरु झाली आहे. ही दोन्ही केंद्र सिहोरा येथील केंद्राना जोडण्यात आली आहेत. या दोन्ही केंद्रावर सिहोऱ्याची यंत्रणा धानाची खरेदी करीत आहेत. पंरतु धानाची खरेदी नियमित होत नाही. असी ओरड सुरुवातीपासुन शेतकरी करीत आहे. खरेदी केलेल्या धानाची साठवणुक करणारी अपुरी गोडावुन आहेत आणि ७ हजार हेक्टर शेती ओलीताखाली होती. तेव्हा सदर गोडावून बांधकाम करण्यात आली आहेत. आता १४ हजार हेक्टर शेती ओलीताखाली येत असतांना नविन गोडावून बांधकाम झाले नाहीत. जुनेच गोडावून आहेत. उत्पादनात वाढ होत असताना सुरक्षा शोधली जात नाही.
शासनाने गोडावून मंजुर करावे अशी मागणी सरपंच राजेंद्र ढबाले, माजी सरपंच जळीराम बांडेबुचे, उमेश तुरकर, किशोर रहांगडाले यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Thousands of quintal grains open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.