शौचालय बांधकाम निधीपासून हजारो लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:17 PM2018-06-11T22:17:26+5:302018-06-11T22:17:36+5:30

तुमसर तालुक्यातील हागणदारी मुक्त गाव संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे ध्येय तालुक्यातील गावा-गावात ग्रामस्थांनी बाळगले. मात्र शौचालय बांधकाम करुनसुद्धा त्याचा निधी मात्र सबंधीत पंचायत समितीमार्फत देण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी त्यापासुन वंचित आहेत. निधीसाठी लाभार्थ्यांना कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.

Thousands of beneficiaries deprived of toilets construction fund | शौचालय बांधकाम निधीपासून हजारो लाभार्थी वंचित

शौचालय बांधकाम निधीपासून हजारो लाभार्थी वंचित

Next
ठळक मुद्देतुमसरातील प्रकार: प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील हागणदारी मुक्त गाव संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे ध्येय तालुक्यातील गावा-गावात ग्रामस्थांनी बाळगले. मात्र शौचालय बांधकाम करुनसुद्धा त्याचा निधी मात्र सबंधीत पंचायत समितीमार्फत देण्यात आले नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी त्यापासुन वंचित आहेत. निधीसाठी लाभार्थ्यांना कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.
तुमसर तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींना शासनाने पायाभूत सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधीत पंचायत समितीमार्फत देण्यात आलेले होते. त्या पायाभुत सर्वेक्षणादरम्यान ग्रामपंचायतींनी हवेत माहीती गोळा करत नियमबाह्य याद्या तयार केल्या होत्या. त्यात जे मुळ लाभार्थी होते त्यांचे नाव अपात्र यादीत वळते केल्याने शौचालय बांधकामाचा चांगलाच गोंधळ सध्या तुमसर तालुक्यात माजला आहे.
तुमसर तालुक्यातील एकुण ७७ ग्रामपंचायती अंतर्गत ३५ हजार ८११ लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीला प्राप्त झालेली होती. त्यापैकी १७ हजार ९११ लाभार्थी शौचालय बांधकामाच्या निधीपासून वंचीत झालेले आहेत. संबंधीत ग्रामपंचायत मार्फत सन २०११-१२ दरम्यान पायाभुत सर्वेक्षण याद्या पंचायत समीती तुमसरला सादर करण्यात आलेल्या होत्या. त्यात ग्रामपंचायत स्तरावर हेतुपरस्पर आपल्या परीचीतांची नावे समाविष्ट करुन मुळ लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे दिसून आले आहे.
या संदर्भात तुमसर तालुक्यातील सिंदपुरी गावातील योजनेपासून वंचित लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना लेखी तक्रार सादर केली आहे. त्यात सिंदपुरी गावातील वंचित लाभार्थ्यांना पायाभुत सर्वेक्षणात इंदिरा आवास योजनेतून घरकुल प्राप्त झालेले होते. त्यात शौचालय बांधकामाचेही समावेश करण्यात आलेले होते.
शासनामार्फत २०१५-१६ दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलचे एक लक्ष व मग्रारोहयो अंतर्गत अकुशल कामाचे मजुरीचे १६ हजार असे एकुण एक लक्ष १६ हजार रुपयांची रक्कम वळती करण्यात आली होती. मात्र शौचालय बांधकामाचे १२ हजार रुपयांचा निधी अद्याप त्या लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने शासनाच्या पारदर्शक कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सिंदपुरी या गावातील वंचित लाभार्थ्यांनी सबंधीत ग्रामपंचायतीला लेखी तक्रार सादर केली. मात्र त्यावर लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची तक्रारही प्रधानमंत्र्यांना सादर केलेल्या तक्रारीत करण्यात आलेली आहे. तक्रारीवर तत्काळ उपायात्मक मार्ग काढला गेला नसल्यास येत्या दिवसात आमरण उपोषणावर बसणार असल्याचे वंचित लाभार्थ्यांनी म्हटले आहे. तशी लेखी प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्री कार्यालयाला फॅक्स केली असल्याची माहिती आहे. आमरण उपोषणावर बसणाऱ्या सिंदपुरी येथील ग्रामस्थांमध्ये प्रमोद गुलाब झोडे, गुलाब घोडीचोर, ओमप्रकाश घोडे, विमल घोडे, इंदिरा मनगटे, तिलक वासनिक, स्वर्णलता वासनिक, याप्रमाणे अनेक वंचित लाभार्थ्यांचा समावेश आहे. अधिकाºयांच्या निर्णयाकडे आता लक्ष आहे.

Web Title: Thousands of beneficiaries deprived of toilets construction fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.