बसफेरी बदलाचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:19 AM2017-11-26T00:19:00+5:302017-11-26T00:20:34+5:30

ग्रामीण भागातून शाळेत शिकणारे विद्यार्थी एसटीने प्रवास करण्यासाठी पास काढतात. विद्यार्थ्यांकडून पासचे पैसे घेऊन परिवहन मंडळ प्रवासाकरीता बसची सेवा वेळेत देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांकडे शुक्रवारी रात्री केली.

The students of the bus ferry change hit | बसफेरी बदलाचा विद्यार्थ्यांना फटका

बसफेरी बदलाचा विद्यार्थ्यांना फटका

Next
ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील प्रकार : बससेवा पुरविण्याची मागणी

ऑनलाईन लोकमत
तुमसर : ग्रामीण भागातून शाळेत शिकणारे विद्यार्थी एसटीने प्रवास करण्यासाठी पास काढतात. विद्यार्थ्यांकडून पासचे पैसे घेऊन परिवहन मंडळ प्रवासाकरीता बसची सेवा वेळेत देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांकडे शुक्रवारी रात्री केली.
तुमसर बसस्थानकावर शेकडो विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव केला. शाळेत जाण्याकरीता व घरी जाण्यास नित्यनेमाने उशिर होतो. कधी रात्रीचे ७ वाजता तर कधी आठ वाजतात. घरचे चिंताग्रस्त होऊन वाट पाहतात, अभ्यास बुडतो, शिक्षणाचा प्रश्न येरणीवर आला असल्याचे विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांना यापूर्वीही सांगितले आहे. बस स्थानकावर सर्वत्र अंधार राहत असल्यामुळे काही अनुचीत घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न मुलांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांच्या असुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आमदार अनिल बावनकर व सितेपारचे सरपंच गजानन लांजेवार यांनी त्याचक्षणी थेट बसस्थानक गाठले. रात्रीचे ७.३० वाजुनही स्थानकावर शेकडो मुलामुलींची गर्दी व बसस्थानकावर एकही बस का नाही. अशी विचारणा बावनकर यांनी आगारप्रमुखांना केली. मानव विकास योजनेअंतर्गत गावागावातील शाळकरी मुलांना ये-जा करण्याकरीता बसेसची सुविधा असतानाही हा गोंधळ का निर्माण होतो. या बावनकर यांच्या प्रश्नावर आगारप्रमुख निरूत्तर झाले.
दिवाळीपूर्वी बसने प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत नव्हता परंतु बसच्या फेºयांमध्ये फेरबदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना वेळीच सुविधा पुरविण्यात आल्या नाही तर आंदोलन करण्याचा ईशारा माजी आमदार अनिल बावनकर यांनी दिला आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तालुक्यातील खापा, परसवाडा, पिपरीचुन्नी, देवरीदेव, बपेरा, बघेडा, गोबरवाही, लोभी या मार्गाहुन बसने शाळा शिकणारे विद्यार्थी प्रवास करतात. याच मार्गावरील बस फेºयांमध्ये बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा करून गावी परत जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटीच्या येण्याजाण्याच्या वेळेत तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सकाळी ९.३० ला येणारी बस कधी ११ तर कधी १२ वाजता येते. परिणामी वर्ग बुडतात. त्यामुळे शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. पैसे खर्च करून परिवहन मंडळातुन काढलेल्या विद्यार्थी पासचा कसलाच उपयोग होत नसल्याचे त्यांनी आगार व्यवस्थापकांना सांगितले. लाल रंगाच्या बसेसमध्ये विद्यार्थी पास असलेल्या विद्यार्थ्यांना बसून देत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना पर्यायी सुविधा देण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून समस्येचे निराकरण करण्याची ग्वाही आगारप्रमुख उजवणे यांनी दिली आहे.

Web Title: The students of the bus ferry change hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.