एकाच दिवशी दोघांचे मरणोत्तर नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:29 AM2019-06-22T01:29:58+5:302019-06-22T01:30:59+5:30

‘‘अनंताच्या पलीकडे जावूनही अस्तित्व करावं, तुमच्या डोळयातूनही कुणी तरी जग बघावं’’ या उक्तीप्रमाणे नेत्रदान करुन अंधांना दिव्यदृष्टी देण्याचे कार्य होत आहे. यातच विरली (बु.) परिसरातील एकाच दिवशी दोघांनी नेत्रदान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

On the same day both posthumous eyesight | एकाच दिवशी दोघांचे मरणोत्तर नेत्रदान

एकाच दिवशी दोघांचे मरणोत्तर नेत्रदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.): ‘‘अनंताच्या पलीकडे जावूनही अस्तित्व करावं, तुमच्या डोळयातूनही कुणी तरी जग बघावं’’ या उक्तीप्रमाणे नेत्रदान करुन अंधांना दिव्यदृष्टी देण्याचे कार्य होत आहे. यातच विरली (बु.) परिसरातील एकाच दिवशी दोघांनी नेत्रदान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. विशेषत्वे दोघांचे सकाळी सहा वाजताच्या सुमारास निधन झाले आणि त्यांच्या परिवाराकडून दोघांचेही नेत्रदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला.
विरली बु. येथील चंद्रभागा बुधा राऊ त (८० वर्ष) यांचे सकाळी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलगा माधव यांने आईचा नेत्रदानाचा संकल्प पूर्ण केला.
त्याच सुमारास विरली (खुर्द) येथील पांडूरंग लगडू शेंडे (८०) यांचेही निधन झाले. मुलगा जगन यांने वडीलांचे नेत्रदान करुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. विरली (खुर्द) येथील हे आतापर्यंत दुसरे नेत्रदान आहे.
ग्रामायण प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नेत्रदानासाठी सहकार्य केले असून चंद्रभागा राऊ त व पांडूरंग शेंडे या दोघांची नेत्रदानाची प्रक्रिया लता मंगेशकर रुग्णालय नेत्रपेढी नागपूर येथील नेत्रतज्ञ डॉ. राजेंद्र चौरागडे आणि सहकाऱ्यांनी पूर्ण केली.
यावेळी प्रामुख्याने रामदास बेदरे, बाकीराव राउत, मिलींद गायकवाड, विनायक शेंडे, गोवर्धन शेंडे, ग्रामायणचे राजेश महावाडे, गजानन ठाकरे, विलास मोटघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: On the same day both posthumous eyesight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.