जुगार अड्ड्यावर धाड ; चार जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:47 AM2018-04-27T00:47:30+5:302018-04-27T00:47:37+5:30

नागपूर ग्रामीण हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडारा पोलिसांनी धाड घालून चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Raid on gambling stand; Four people arrested | जुगार अड्ड्यावर धाड ; चार जणांना अटक

जुगार अड्ड्यावर धाड ; चार जणांना अटक

Next
ठळक मुद्दे१६ लाखांचा मुद्देमाल जप्त : भंडारा पोलिसांची नागपूर हद्दीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नागपूर ग्रामीण हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडारा पोलिसांनी धाड घालून चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये महाविर शशिकांत भलगट (४०) रा. राममंदिर वॉर्ड भंडारा, धनराज शामराव राखे (४०) रा. परसोडी, पुरुषोत्तम सोमाजी काटकर (२९) रा. मौदा, हनुमान शामराव वंजारी (३४) रा. पेवठा यांचा समावेश आहे. जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत जुगार सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनिता साहु यांना कळताच त्यांनी जवाहरनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली.
संयुक्त पथकाने जवाहरनगर हद्दीत पाहणी केली असता जुगार हा नागपूर ग्रामीणमधील मौदा पोलीसठाण्याच्या हद्दीत असलेल्या महादुला येथील देवराम कोसरे यांच्या शेतशिवारात सुरू होता.धाड घालून चार इसमांना ताब्यात घेतल, तर उर्वरित पाच इसम घटनास्थळावरुन पसार झाले.
पसार झालेल्यांमध्ये अंकुश वंजारी रा. पेवठा, विक्की रा. भंडारा, मनोज लारोकर रा. मौदा, विजु जौंजाळ रा. खरबी, नाजीर पठाण रा. दवडीपार बेला यांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन ६४ हजार ७० रुपये, तीन मोबाईल एक चारचाकी वाहन सहा दुचाकी आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अजाबराव नेवारे, हवालदार मिलिंद जनबंधू, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले, सहा. फौजदार अरुण झंझाड, हवालदार सुधीर मडामे, तुळशीदास मोहरकर, महेश चोपकर, नायक बबन अतकरी, शिपाई वैभव चामट, मनोज अंबादे, रमाकांत बोंदरे यांनी केली.
परजिल्ह्यात कारवाई
काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी भंडाऱ्यात येऊन आयपीएल जुगार अड्ड्यावर धाड घातली होती. आता भंडारा पोलिसांनी नागपूर जिल्हातंर्गत येणाºया क्षेत्रात कारवाई केल्याने परजिल्ह्यातील कारवाईची घटना आठवणीत आली आहे.

Web Title: Raid on gambling stand; Four people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा