खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:14 PM2019-01-20T22:14:43+5:302019-01-20T22:15:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने व इतर संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन शिक्षण आयुक्त ...

Private Primary Teachers' Association | खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे

खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे

Next
ठळक मुद्देआश्वासनानंतरही समस्या सुटेना : विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खाजगी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने व इतर संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन शिक्षण आयुक्त यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा झाली. परंतु शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व शिक्षण उपसंचालक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. परिणामी अनेक शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शनिवारला नागपुर येथिल शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे देण्यात आले .
वारंवार विनंती करूनही शिक्षण आयुक्त यांचे आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचे चित्र सध्या शिक्षण विभागात पहायला मिळते. कारण शिक्षण आयुक्ताचे आदेश असून देखील शिक्षण उपसंचालक खाजगी प्राथमिक शिक्षक संघासोबत कोणतीही चर्चा करीत नाही, असे शिक्षकसंघाचे विभागिय सचिव मोहन सोमकुवर यांनी शिक्षण आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केलेले आहे.
शिक्षण विभागात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत असून त्यावर आळा बसावा, शिक्षकांचे सकारात्मक निर्णय जलद व्हावे यासाठी भारतीय प्रशासन सेवेतुन आयुक्त हे पद भरल्या गेले. आयुक्त पदावर डॉ.पुरूषोत्तम भापकर वगळता चांगल्या निर्णय घेणाºया अधिकाºयांच्या नेमणुका झाल्या परंतु शिक्षण विभाग त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेला असल्याचे खाजगी प्राथ.शिक्षक संघाचा दावा आहे.
शिक्षण विभागात अनेक घोळ असून समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या होत असल्याने शिक्षकात नैराश्याचे वातावरण आहे. समायोजन प्रक्रियेत नागपुर जिल्ह्यात नगरपरिषदेतील शाळेत रिक्त जागा असतांना, तसेच शासन निर्णय व शिक्षण आयुक्तांचे दि.२३ आॅगष्ट २०१८ चे बैठकीतील र्निदेश असुनही समायोजन प्रक्रिया न राबविता इतर जिÞल्हात शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षकांच्या रिक्त जागा व अतिरिक्त शिक्षक असताना शिक्षक न देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा संपुष्टात आणण्याची मानसिकता म्हणावी काय ? असा सवाल शिक्षक संघाच्या पदाधिकारी उपस्थित केला. पैसे देणारांच्याच फाईल्स काढल्या जातात असेही त्यांनी उदाहरणासह स्षष्ट केले.
भंडारा जिÞल्हातील पंचशील प्राथमिक शाळा भागडी येथील सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापक रामचन्द्र मेश्राम यांच ( २०१६) पेन्शन प्रकरण चिरीमिरीसाठी मागील दोन वषार्पासून शिक्षणाधिकारी कार्यालयात रखडले आहे. तसेच न्यु गर्ल्स शाळेतील दोन शिक्षिकांची शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी नियम धाब्यावर ठेउन मान्यता रद्द करुन मागील सहा महिन्यापासून वेतन बंद केले त्यामुळे दोन्ही शिक्षिका़चे कुटुंब रस्त्यावर आले असून हलाकीचे जिÞवन जगत आहेत.
या आंदोलनात शिक्षकांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली. आंदोलन सभेला प्रमोद रेवतकर, रहमतुल्लाह खान, विजय नंदनवार, ज्ञानेश्र्वर वाघ, मोहन सोमकुअर, संजय बोरगावकर, लोकपाल चापले, दारासिंग चव्हाण, विलास खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले
शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या समस्या निराकरण करण्याकरीता संघटनेच्या शिष्टमंडला सोबत बैठकीचे आयोजन करुन संबंधित जिÞल्हांचे शिक्षणाधिकारी यांनाही सभेला उपस्थित ठेवण्यास सांगितले. त्यानुसार ३० जानेवारीला खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी सोबत शिक्षण उपसंचालक यांनी बैठकीचे आयोजन केले आहे.
यावेळी संघटनेचे मंगल कुंभारे, चंद्रप्रभा चोपकर, कल्पना काळबांडे, कुमुद बालपांडे, गोपाल मुºहेकर, धनवीर कानेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रेमलाल मलेवार, अरूण नवरे, विजय आगरकर, महेश गिरी, ज्ञानेश्वर घंगारे, प्रमोद कुंभारे, राजकुमार शेंडे, गंगाधर करडभाजने, श्रावण जाधव, पवन नेटे, रोशन टेकाडे, दिवान फेंडर, वसंत हिवसे, पंजाब राठोड, मारोती देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Private Primary Teachers' Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.