माळरानातील बहुगणी पळस झाला दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:18 PM2019-03-19T21:18:33+5:302019-03-19T21:18:54+5:30

औषधीय गुणामुळे आयुर्वेदात अनेक वृक्षांना कल्पवृक्ष मानले आहे. त्यात पळसवृक्षाचाही समावेश आहे. शितलतेच्या गुणामुळे इतर कल्पवृक्षांपेक्षा ग्रामीण भागात पळसवृक्षाचा ग्रामीणांशी प्रत्यक्ष जवळचा संबंध होता. अनेक संतांनी या वृक्षाची महती सांगितली आहे.

Most of the fishermen were scared | माळरानातील बहुगणी पळस झाला दुर्मिळ

माळरानातील बहुगणी पळस झाला दुर्मिळ

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन पिढीला माहितीची गरज : -तर हजारो लोकांना उपलब्ध होऊ शकतो रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : औषधीय गुणामुळे आयुर्वेदात अनेक वृक्षांना कल्पवृक्ष मानले आहे. त्यात पळसवृक्षाचाही समावेश आहे. शितलतेच्या गुणामुळे इतर कल्पवृक्षांपेक्षा ग्रामीण भागात पळसवृक्षाचा ग्रामीणांशी प्रत्यक्ष जवळचा संबंध होता. अनेक संतांनी या वृक्षाची महती सांगितली आहे.
आता नविन पिढीला त्याचे महत्व ध्यानात येत नसल्याने या वृक्षाची सरपणासाठी सर्रास कत्तल होत असल्याने या वृक्षवल्लीचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. अशीच स्थिती राहिली तर येत्या ५-१० वर्षात पळस नामशेष झाल्यास आश्चर्य वाटायला नको. काही वषार्पूवी परिसरातील जंगलात पळसाच्या प्रचंड संख्येमुळे फुललेले पळस जंगलात आगल्यासारखे भासायचे. परंतु आता जंगलातही हे वृक्ष एकट्यादूकट्या संख्येतच दिसत आहेत. शेतातील पळस वृक्षांची संख्याही कमी झाली आहे. लोकसंख्या वाढीमुळे गावांचे क्षेत्रफळ फूगत चालले आहे. त्यामुळे गावाजवळ असलेली पळसवृक्ष पूर्णपणे नामशेष झाले आहेत. होळीच्या दिवशी पळसफुलाच्या पाण्यात घालून आंघोळ केल्याने चर्मरोग होत नाही, असा समज ग्रामीण क्षेत्रात असल्याने ग्रामीण लोक स्वत: व आपल्या पाल्यांना याने आंघोळ घालतात.
वाळलेल्या फुलांचा शरबत शितलता प्रदान करतो म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण आजही वाळलेल्या पळसफुलांचा शरबताकरीता उपयोग करतात. हे शरबत देऊन पाहूण्यांचे पाहूनचार करतात. संशोधक डॉ.शांतीलाल कोठारी यांनी त्यावर बरेच संशोधन करून पळसफुलाच्या शरबताचा प्रचार
प्रसार करीत आहेत. धुळवळीच्या दिवशी पळसफुलांचा रंग खेळण्याची प्रथा आहे. तर होळीपूर्वी दहा पंधरा दिवसाआधीपासून खेळला जाणारा 'घानमाकड' नावाचा झूला याच पळसफुलाच्या लाकडाने तयार करण्यात येत होते.
होळीपर्यंत घानमाकड खेळून त्यानंतर त्याच लाकडाची होळी केल्या जात होते. पळसाच्या पानाचा वापर पत्रावळी तयार करण्याकरीताही होत असे. हजारो लोकांना यामुळे रोजगार मिळत होते. पण आता कागदी व प्लास्टिक पत्रावळीमुळे पळस पानाच्या पत्रावळी निकामी झाल्या आहेत. पळसाच्या बियांपासून निघणारे तेल आयुवेर्दीक औषधी व साबण आदी तयार करण्याकरीता वापरले जात होते.

Web Title: Most of the fishermen were scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.