मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 09:41 PM2019-03-10T21:41:51+5:302019-03-10T21:42:11+5:30

दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि भंडारा नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील मुस्लिम लायब्ररी सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले.

Meritorious women's pride in the gathering | मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांचा गौरव

मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांचा गौरव

googlenewsNext
ठळक मुद्देविविध योजनांचीही दिली माहिती : जागतिक महिला दिनाचे औचित्य, भंडारा नगर परिषदेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि भंडारा नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील मुस्लिम लायब्ररी सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मेंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, महिला व बालकल्याण सभापती वनिता कुथे, शिक्षण समिती सभापती चंद्रकला भोपे, उपसभापती आशा उईके, नगरसेवक संजय कुंभलकर, नितीन धकाते, कैलाश तांडेकर, नगरसेविका गीता सिडाम, साधना त्रिवेदी, मधुरा मदनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ.अपर्णा जक्कल, अ‍ॅड. प्राची महांकाळ, प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे, प्रशासकीय अधिकारी अश्विनी चव्हाण, डॉ.मनीषा डांगे, रोशनी चुटे उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष सुनील मेंढे म्हणाले, महिलांनी स्वत:ला कमी न लेखता आपल्यामध्ये असलेली सुप्त गुण ओळखून यशाची शिखरे गाठावी. आज महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली असून देशाच्या विकासात सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक जनबंधू, डॉ.अपर्णा जक्कल, अ‍ॅड.प्राची महांकाळ यांचा सत्कार करण्यात आला.
दहावीत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मौलाना अब्दुल कलाम उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी सिजरा अहमद, नगरपरिषद गांधी विद्यालयाचा विद्यार्थिनी पायल राजेश बागडे आणि बारावीतील गुलशन शहजाद सिद्धीकी व आकांक्षा विकास खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला.
दिल्ली येथे आयोजित शहर समृद्धी उत्सवात शहरातील श्रमण बचत गटाच्या सदस्या रिता भोंडे व आसावरी बचत गटाच्या हेमलता मोटघरे, रुपाली मेश्राम यांची निवड झाली असल्याने त्यांचा महिला उद्योजिका म्हणून सत्कार करण्यात आला.
स्वच्छता क्षेत्रात कामगिरी करणारे सफाई कामगार राजकुमारी सोनेकर, राज्यस्तरीय नेटबॉल चॅम्पीयनमध्ये प्रथम क्रीडा पुरस्कार पटकाविणारी रुपाली बावनकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अंतर्गत स्थापन निधी अकरा महिला बचत गटांना याप्रसंगी वितरीत करण्यात आले. ब्युटीथेरपीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर कौशल्य प्रशिक्षणाची माहिती भंडारा पॅरामेडीकलचे डॉ.अनिल कुर्वे, काळबांधे, प्रशांत मस्के आदी उपस्थित होते.
संचालन उषा लांजेवार यांनी तर आभार रेखा आगलावे यांनी मानले. यशस्वितेसाठी वनिता बोटकुले, रंजना साखरकर, रंजना गौरी, इंदिरा लांजेवार, भावना बोरकर, भावना शेंडे, मंदा कावरे, संगीता बांते यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Meritorious women's pride in the gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.