हजारो दमा रुग्णांनी घेतला औषधाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:24 PM2018-10-24T21:24:31+5:302018-10-24T21:25:00+5:30

दमा रुग्णाला नि:शुल्क वनौषधी मिळत असल्याने व त्याचा लाभ होत असल्यामुळे दमा आजार असलेल्या हजारो रुग्णांनी औषधाचा कोजागिरी पोर्णिमेच्या पर्वावर लाभ घेतला.

Medicines Benefit Of Thousands Of Asthma Patients | हजारो दमा रुग्णांनी घेतला औषधाचा लाभ

हजारो दमा रुग्णांनी घेतला औषधाचा लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देअड्याळ मंदिरात उपक्रम : गर्दीमुळे जागाही पडली अपुरी

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : दमा रुग्णाला नि:शुल्क वनौषधी मिळत असल्याने व त्याचा लाभ होत असल्यामुळे दमा आजार असलेल्या हजारो रुग्णांनी औषधाचा कोजागिरी पोर्णिमेच्या पर्वावर लाभ घेतला. अड्याळ येथील प्रसिद्ध व जागृत हनुमंत देवस्थान परिसरात हा उपक्रम पार पडला. देवस्थान पंचकमेटी अड्याळतर्फे मागील दशकभरापासून हा उपक्रम सुरू आहे.
शरदपोर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी देवस्थान मंडळातर्फे दमा रुग्णांना मोफत औषध देण्यात येते. या औषधामुळे रुग्ण पुर्णत: बरे झाल्याचे प्रमाण सिद्ध झाल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून व अन्य राज्यातूनही रुग्ण येथे येत असतात. दरवर्षी येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दीमुळे मंदिर परिसरातील पटांगणही कमी पडले. मिळेल त्या ठिकाणी उभे राहून रुग्णांनी औषधी प्राप्त केली.
यासंदर्भात देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष भाष्करराव पोटवार म्हणाले की, बाहेरून आलेल्या रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही व ते रुग्ण औषध घेतल्याशिवाय जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. बाहेरून आलेल्या रुग्णांना रात्रीच्यावेळी परत जाण्याची सोय नसेल अशा रुग्णांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मागील दहा वर्षांच्या कारकिर्दीत आजघडीला रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. यावर्षी सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आली आहे. यामुळे दमा औषधीवरचा विश्वास वाढत असल्याचेही पोटवार यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी अड्याळवासीयांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.

Web Title: Medicines Benefit Of Thousands Of Asthma Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.