महर्षीचा यश जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:50 PM2019-05-06T22:50:02+5:302019-05-06T22:50:24+5:30

केंद्रीय बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी घोषीत झाला. यात भंडारा तालुक्यातील फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेचा यश विकास कुंभारे याने ९८.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जिल्ह्याचा निकाल ९५ टक्के लागल्याची प्राथमिक माहिती असून एकूण ९३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

Maharishi's success is the highest in the district | महर्षीचा यश जिल्ह्यात अव्वल

महर्षीचा यश जिल्ह्यात अव्वल

Next
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९५ टक्के : यंदाही मुलींचीच भरारी, ९३० विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्रीय बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी घोषीत झाला. यात भंडारा तालुक्यातील फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेचा यश विकास कुंभारे याने ९८.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जिल्ह्याचा निकाल ९५ टक्के लागल्याची प्राथमिक माहिती असून एकूण ९३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी निकालात सरशी घेतली आहे. जिल्ह्यात सीबीएसईच्या डझनभर शाळा असून या शाळांचा निकाल उत्तम लागला आहे.
फुलमोगरा येथील महर्षी विद्या मंदिर शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून या शाळेतून २३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात यश विकास कुंभारे हा जिल्ह्यातून प्रथम तर रँकिंगच्या आधारावर देशातून चवथ्या क्रमांकावर असल्याचे प्राचार्य श्रृती ओहळे यांनी सांगितले. शाळेतून द्वितीय क्रमांक पुरू झिंगरे याने प्राप्त केला आहे. त्याला ९७.६० टक्के गुण मिळाले आहेत. तृतीय क्रमांकावर ओम गभने, कृणाल भुरे व चैतन्य गावंडे यांना समाधान मानावे लागेल. तिघांनाही ९६.६० टक्के गुण मिळाले आहे. ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५७ इतकी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्रृती ओहळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व पालकांनी कौतुक केले आहे.
तुमसर येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतून ११२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. येथेही शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतून करण घरडे याने ९६.२० टक्के गुण घेवून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे.
तुमसर येथील शिरीनभाई नेत्रावाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. शाळेतून शैली भगत या विद्यार्थीनीने ९६.८० टक्के गुण घेवून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. तृतीय क्रमांक स्रेहल पोपटानी (९६ टक्के) तर तृतीय क्रमांक श्रेयश हटकर (९५.८० टक्के) याने प्राप्त केला.
जवाहरनगर येथील केंद्रीय विद्यालयातून एकूण ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९७ टक्के गुण मिळवून दिशा शेंडे ही शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक निधी तिरपुडे (९६.६ टक्के) व तृतीय क्रमांक साक्षी शर्मा (९४.६ टक्के) हिने प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य अनिल घोलपे व शिक्षकांनी कौतुक केले आहे. भंडारा येथील सनीज स्प्रिंग डेल शाळेतून श्रेया निखाडे हिने ९७.६० टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक वैष्णवी पडोळे (९७.२० टक्के) तर तृतीय क्रमांक निकीता कटरे (९७ टक्के) हिने प्राप्त केला आहे.
भंडारा येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी यश मिलिंद बोंगीरवार याने ९४.४० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आला आहे. तो आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक जगदाळे, शिक्षकवृंद व आई-वडीलांना दिले आहे.
भंडारा येथील सेंट पिटर्स शाळेतून श्रेयस राजकुमार मौर्य याने ९२.८ टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे ते आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शाळेच्या मुख्याध्यापक व गुरूजनांना दिले आहे. भंडारा येथील सेंट मेरीस शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. याशळेतील सर्वच विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. वरठी स्थित सनफ्लॅग शाळेची विद्यार्थीनी प्रेरणा शंकर राठोड हिने ९५.८० टक्के गुण घेवून शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रेरणाने भारतीय प्रशासनिक सेवेत कॅरियर घडविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यशला जायचंय वैद्यकीय क्षेत्रात
जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत आलेला महर्षी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी यश कुंभारे याला वैद्यकीय क्षेत्रात करिंअर घडवायचे आहे. जीवशास्त्र या विषयात त्याची प्रचंड आवड असून विज्ञान शाखेत प्रवेश करून भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. यशचे वडील विकास कुंभारे हे कृषी विकास अधिकारी असून आई वैशाली या गृहीणी आहेत. यशचा लहान भाऊआठव्या वर्गात शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे यशला विज्ञान, संस्कृत या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहे. तर गणित विषयात ९९ गुण मिळाले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक व आई-वडिलांना देतो.

Web Title: Maharishi's success is the highest in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.