हनुमान तलावातील कमळ कोमेजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:28 PM2019-04-13T22:28:52+5:302019-04-13T22:29:17+5:30

कमळ चिखलात उगवते. परंतु चिखलाचा एकही वाईट गुण घेत नाही. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. तुमसर शहरातील हनुमान तलावात मोठ्या संख्येने कमळाची फुले बहरली आहेत. मात्र या तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने कमळ फुल कोमेजून जात आहे.

Loneliness in the Hanuman Lake | हनुमान तलावातील कमळ कोमेजले

हनुमान तलावातील कमळ कोमेजले

googlenewsNext
ठळक मुद्देजैवविविधतेला धोका : तलावाचे वैभव नामशेष होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कमळ चिखलात उगवते. परंतु चिखलाचा एकही वाईट गुण घेत नाही. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. तुमसर शहरातील हनुमान तलावात मोठ्या संख्येने कमळाची फुले बहरली आहेत. मात्र या तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने कमळ फुल कोमेजून जात आहे. कमळाचा नैसर्गिक अधिवास तलाव व पानथडीची जागा कमी होत असून जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे.
कमळ चिखलात आणि पाण्यात आढळते. ही एक जल वनस्पती आहे. तुमसर शहरात देव्हाडी मार्गावर खासगी हनुमान तलाव आहे. हा तलाव प्राचीन आहे. एकेकाळी तलावाला वैभव प्राप्त झाले होते. येथील एका श्रीमंत अग्रवाल कुटुंबियांनी या तलावाला देखणे रुप दिले होते. आजही हा तलाव येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. सुमारे ७० ते ८० एकरात शहराच्या मध्यभागी हा तलाव आहे. या तलावात सध्या मोठ्या संख्येने पांढरे कमळ फुलले आहे. सकाळी सुर्योदय समयी संपूर्ण तलाव पांढºया शुभ्र कमळाने फुललेला दिसतो. या तलावाचे वैभव कमळ फुल असून तेच आता दुर्लक्षित झाले आहे.
तलावाच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकला जातो. रद्दी, रद्दी पेपर, पॉलिथीन, शीतपेयाच्या बाटल्या येथे फेकल्या जातात. रात्री तलावांजवळ मद्यपींची गर्दी दिसून येते. नैसर्गिक स्थळ असल्याने येथे आंबटशौकीनांचा अड्डा असतो. त्यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. कमळ सौंदर्याचे प्रतीक असून कमळाचे फुल सुगंधी आणि मोठे असते. जीवनाचे दर्शन घडविणारे कमळ फुलाचा व पानाचा औषधीसाठी वापर केला जातो. मात्र आता हे कमळच दुर्लक्षित झाले आहे. कमळाची पाने व फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येवून वाढतात. बहुउपयोगी कमळ फुल वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

असे आहे महत्त्व
देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारात कमळाचा उल्लेख आहे. भारतीय डाक विभागाने कमळावर तिकीट प्रकाशित केले आहे. कमळाला ज्ञानाचे प्रतीक मानतात. अध्यात्मात कमळ हे फुल देवी लक्ष्मीच्या हातात आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्हच कमळ आहे.

Web Title: Loneliness in the Hanuman Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.