ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला शेवटची घरघर

By admin | Published: May 16, 2017 12:23 AM2017-05-16T00:23:23+5:302017-05-16T00:23:23+5:30

स्थानिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद भंडाराची नळयोजना दीड वर्षांपासून बंद असल्याने....

The last house in rural water supply scheme | ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला शेवटची घरघर

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला शेवटची घरघर

Next

दीड वर्षांपासून पाणीपुरवठा बंद : ३५ वर्षांपूर्वीची नळयोजना जीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : स्थानिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद भंडाराची नळयोजना दीड वर्षांपासून बंद असल्याने लाखनी वासियांना नगरपंचायत व मुरमाडी व सावरी येथील लोकांना ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा स्त्रोतावर अवलंबून राहावे लागत आहे.
कुचकामी ठरलेल्या नळयोजनेकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने लाखनी येथील १२५०० व मुरमाडीतील ७५०० लोकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणीपुरवठा ठप्प असल्याने व दीड वर्षांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने स्थानिक शाखा अभियंता कार्यालय व नळयोजनेचे परिसर भकास व बकाल झाला आहे. १९८३ पासुन लाखनी व मुरमाडी व सावरी येथील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना सुरु करण्यात आली होती. २.२५ लाख लिटर क्षमतेच्या टाकीद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. ३४ वर्षांपासूनच्या या नळयोजनेला शेवटची घरघर लागली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेद्वारे लाखनी व मुरमाडी येथील १ हजार १०० ग्राहकांना नियमितपणे पाणी पुरवठा केला जात होता. स्थानिक टाकीत जांभळी बंधारा येथील पंपहाऊसवरुन पाणी आणले जात होते. गेल्या पाच वर्षांपर्वुी अशोक बिल्डकॉनने राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले होते. त्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प पडली होती. त्यानंतर ग्राहकांची संख्या कमी होत गेली करांचा भरणा होत नव्हता. ५० लक्ष रुपये ग्राहकांवर थकित आहे. नळयोजना खराब झाली. रस्त्याचे सिमेंटीकरण आदी अनेक कारणामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद पडली. सध्या शाखा अभियंता व दोन कर्मचारी कार्यरत आहेत.
लाखनी नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज निर्माण झाली. जुनी टाकी ही मुरमाडी व सावरी गावांना पाणी पुरवण्यास सक्षम असतांनीही पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. १५ वर्षांपासुन जीवन प्राधीकरणची ५ लक्ष लिटर क्षमतेची टाकी तयार आहे व गावात नळयोजना घातली आहे पंरतु जीवन प्राधीकरणची योजना लाखनी नगरपंचायतच्या हदृदीत येत असल्याने नगरपंचायत सदर योजना स्विकारण्यास तयार नाही व जीवन प्राधीकरणाची योजना निकृष्ठ असुन टाकी सुरु होण्यापूर्वीच गलीतपात्र झाल्याचे दिसून येत आहे. नवीन टाकी पडण्याची भिती परिसरातील लोकांना वाटत असते. जीवन प्राधीकरणच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च झाले. सदर योजना जिल्हा परिषद स्विकारावयास तयार नाही. नगरपंचायतने नकार दिला आहे. त्यामुळे ५ लक्ष लिटर क्षमतेची टाकी पांढरी हत्ती ठरलेली आहे.
लाखनी व मुरमाडी येथील जनतेची तृष्णा भागवणारी योजना इतिहास जमा होणार काय अशी भिती जनतेला वाटत आहे. लाखनी व मुरमाडी येथे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायत व ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरत आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नळयोजना सुरु करण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधीकरणची योजना नगरपंचायतने स्विकारली तर ५ लक्ष लिटर क्षमतेच्या टाकीचा उपयोग होईल. मुरमाडी येथील पाणीपुरवठा योजना ३५ वर्षांपूर्वीची आहे. त्यावर खर्च करणे जिल्हा परिषदेला परवाडणारे नाही. सदर ग्रामीण पाणीपुरवठा योजना मुरमाडी ग्रामपंचायतने स्विकारलेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा ठप्प आहे.
- एस. डी. मारबते, शाखा अभियंता, ग्रा.पा.पुरवठा, भंडारा

Web Title: The last house in rural water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.