अधिकाऱ्यांचा उद्घाटनाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:22 PM2017-12-03T22:22:35+5:302017-12-03T22:24:00+5:30

दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. तरी अधिकाऱ्यांचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे चित्र रविवारला भंडारा शहरात बघायला मिळाला.

'Kho' inaugurated by officials | अधिकाऱ्यांचा उद्घाटनाला ‘खो’

अधिकाऱ्यांचा उद्घाटनाला ‘खो’

Next
ठळक मुद्देदिव्यांग क्रीडा स्पर्धा : स्पर्धक हिरमुसले

प्रशांत देसाई।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. तरी अधिकाऱ्यांचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे चित्र रविवारला भंडारा शहरात बघायला मिळाला.
दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे क्रीडा संकुलावर उद्घाटन होते. या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेत नावे असलेल्या निलिमा इलमे यांना वगळल्यास सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या स्पर्धेकडे पाठ दाखविली. यामुळे मोठ्या अपेक्षेने स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांगांच्या चेहºयावर नैराश्याचे भाव दिसून आले.
सामाजिक न्याय विभाग अपंग कल्याण आयुक्त, जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारला सकाळी १० वाजता नियोजित करण्यात आले. याकरिता मान्यवरांच्या तारखा घेऊन निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांची नावे आहेत. तर प्रमुख अतिथीमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, बांधकाम व आरोग्य सभापती विनायक बुरडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर यांच्यासह समाजकल्याण समिती सदस्य उत्तमकुमार कळपाते, मनोरमा जांभुळे, रेखा वासनिक, रेखा भुसारी, हेमंत कोरे, वंदना पंधरे, वर्षा रामटेके, निलीमा इलमे, रमेश डोंगरे, नेपाल रंगारी, संगीता मुंगुसमारे यांची नावे प्रकाशित करण्यात आली. या क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा मुळ उद्देश.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी विशेष मुलांची शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळांमधील शेकडो मुलांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार असल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर उद्घाटन सोहळ्यापूर्वी एक वेगळाच उत्साह दिसून येत होता. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनातून या दिव्यांगांना त्यांच्या आयुष्यात नव्या उमेदीने जीवन जगण्याचा मुलमंत्र मिळावा, हीच त्यांची अपेक्षा होती. एकीकडे समाजाचा या दिव्यांगांकडे बघण्याच्या दृष्टीकोणात बदल होत असल्याचे दिसून येत असतानाचा, आमदार, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडून त्यांना शब्दरूपी मायेची थाप मिळेल ही अपेक्षा असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटनालाच जाणे टाळले.
मागील आठवड्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील रविवारला जिल्ह्यात येऊन गेले. त्यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यामुळे एखाद्या मंत्र्यांच्या दौºयाप्रसंगीच हे अधिकारी उपस्थित राहतात. मग दिव्यांगांसाठी यांच्याकडे वेळ नसल्याचे यावरून दिसून आले. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या अशा उदासीनतेमुळे स्पर्धेसाठी आलेल्या शिक्षक व पालकांमध्येही कमालीची नाराजगी होतील. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यांकडून शाबासकीची थाप मिळावी केवळ एवढीच अपेक्षा या दिव्यांगांनी मनोमन व्यक्त केली होती. मात्र रविवार सुटीचा दिवस असल्याने कदाचित या लोकप्रतिनिधी किंवा अधिकाºयांनी या स्पर्धेला जाणे टाळले किंवा अन्य कुठले कारण असावे याबाबत कळू शकले नाही.

Web Title: 'Kho' inaugurated by officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.