बावनथडी प्रकल्पातून साडेचार हजार हेक्टर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 05:00 AM2022-05-25T05:00:00+5:302022-05-25T05:00:15+5:30

२१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.

Irrigation of four and a half thousand hectares from Bawanthadi project | बावनथडी प्रकल्पातून साडेचार हजार हेक्टर सिंचन

बावनथडी प्रकल्पातून साडेचार हजार हेक्टर सिंचन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. तुमसर तालुक्यातील २१ गावांतील तब्बल साडेचार हजार हेक्टर सिंचन बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर करण्यात आले. धान पिकासह इतर पिकांसाठी या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. 
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर सितेकसा येथे बावनथडी नदीवर आंतरराज्यीय राजीव सागर प्रकल्प आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील पिकासाठी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. २१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.
गत ४ मे रोजी तुमसर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बावनथडी प्रकल्पात पाणी सोडले. परिणामी, नळ योजनांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. 
तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरत असून आता आगामी खरीप हंगामातील धान नर्सरीसाठी या प्रकल्पाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी आहेत. 

बावनथडी १७.४२ टक्के जलसाठा
- बावनथडी प्रकल्पात सद्य:स्थितीत ४४.३७५ दलघमी जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या एकूण जलसाठ्याचा हा पाणीसाठा १७.४२ टक्के आहे. या प्रकल्पातील क्षमता ३४४.४० मीटर आहे. २३ मे रोजी या प्रकल्पाचा जलस्तर ३३७.१० मीटर होता. प्रकल्पाचे सहाही गेट सध्या बंद आहेत.

यावर्षी उन्हाळी हंगामासाठी नियोजनानुसार सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. आगामी खरीप हंगामात सिंचनासाठी १५ जूननंतर नियोजन करण्यात येईल. 
-प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंता,  पाटबंधारे विभाग, भंडारा

 

Web Title: Irrigation of four and a half thousand hectares from Bawanthadi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.