शासनाचे विचार प्रगतीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 09:45 PM2019-01-19T21:45:13+5:302019-01-19T21:45:36+5:30

लंडनमधील बाबासाहेबांचा घर आम्ही भाजप सरकारने घेतला इंदू मिलच्या जागेसाठी आंबेडकरी संघटना लढल्या. त्यावेळी काँग्रेसची सरकार होती. परंतु काहीच झाले नाही. परंतु भाजपच्या काळात माझ्या पुढाकाराने इंदू मिलची जागा विकत घेतली व तो प्रश्न सोडविला.

Government's ideas are in progress | शासनाचे विचार प्रगतीचे

शासनाचे विचार प्रगतीचे

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : साकोली येथे अनुसूचित जातीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : लंडनमधील बाबासाहेबांचा घर आम्ही भाजप सरकारने घेतला इंदू मिलच्या जागेसाठी आंबेडकरी संघटना लढल्या. त्यावेळी काँग्रेसची सरकार होती. परंतु काहीच झाले नाही. परंतु भाजपच्या काळात माझ्या पुढाकाराने इंदू मिलची जागा विकत घेतली व तो प्रश्न सोडविला. भाजपनेच बौद्धांना आरक्षण दिले. काँग्रेसने जाती तोडून आपल्या फायद्यासाठी वेगवेगळे गट निर्माण केले. भाजप घरकुल आवास योजनेकडे स्वत: पालकमंत्री लक्ष देणार आहेत. भीमा कोरेगाव मध्ये जे काही झाले ते दुर्देवी झाले. परंतु ती वादग्रस्त जागा मी स्वत: तहसीलदार, एसडीओ यांना फोन करून व कोर्टातून प्रयत्न करून मिळवून दिली. केंद्रातील सरकार देशातील अनुसूचित जाती व जमाती व सर्वांच्या प्रगतीचा विचार भाजप सरकार करणार आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी आशीर्वाद लॉन येथे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून बोलत होते. मंचावर जिल्हा अध्यक्ष तारिक कुरैशी, आमदार बाळा काशीवार, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, अरविंद भालाधरे, नगराध्यक्ष धनवंता राऊत, डॉ.गजानन डोंगरवार, लखन बर्वे, सभापती उषा डोंगरवार, अ‍ॅड.सीताराम हलमारे, घनश्याम राऊत इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार बाळा काशीवार, तारीक कुरैशी, डॉ.नेपाल रंगारी यांचेही भाषणे झाली. संचालन हसंराज वैद्य जिल्हा महामंत्री तर आभार इंजि. मंगेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हंसराज वैद्य, सुरेश गजभिये व इतर सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Government's ideas are in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.