बावनथडी प्रकल्पाच्या अडचणी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:36 PM2018-02-17T22:36:20+5:302018-02-17T22:36:49+5:30

यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार असून त्यासाठी आतापासून कार्यवाही करावी. संभाव्य पाणी टंचाईची झळ बसणार नाही, यादृष्टिने नियोजन करा, अशा सूचना करून महिनाभरात बावनथडी प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत अडचणी सोडविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Fix problems of Bavanthadi project | बावनथडी प्रकल्पाच्या अडचणी सोडवा

बावनथडी प्रकल्पाच्या अडचणी सोडवा

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : तुमसर उपविभाग आढावा बैठक

आॅनलाईन लोकमत
भंडारा : यावर्षी पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार असून त्यासाठी आतापासून कार्यवाही करावी. संभाव्य पाणी टंचाईची झळ बसणार नाही, यादृष्टिने नियोजन करा, अशा सूचना करून महिनाभरात बावनथडी प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत अडचणी सोडविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
तुमसर उपविभागाची आढावा बैठक बालाजी सभागृहात पार पडली. आ.चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यावेळी उपस्थित होते. प्रारंभी ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेअंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. यावेळी ‘व्यथा शेतकऱ्यांच्या’ या चित्रफितीचे आ.वाघमारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ही चित्रफित सर्व ग्रामपंचायतीत दाखविण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, अवैध दारूबंदीसाठी सर्व ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दलाचे गठन करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रीला आळा बसेल. सर्व विकास कामांचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याच्या सूचना दिल्या.
जलयुक्त शिवारच्या कामाची माहिती सर्व विभागांनी सरपंचांना द्यावी, मुख्यमंत्र्ंयाचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याने या कामाला प्राधान्य द्यावे, ३१ मार्चपूर्वी सर्व कामे पूर्ण करावे, असे सांगून जलयुक्त शिवारच्या कामांचा उपविभागीय अधिकाºयांकडे कामाचा आढावा सादर करण्याचे निर्देश दिले. अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांचे पंचनामे करतांना जनतेची त्यात स्वाक्षरी घ्या व त्याचे व्हिडीओ शुटींग करा, असे निर्देशही त्यांनी दिले. रबी पिकाच्या नियोजनाबाबत १२१ गावांचे सर्वेक्षण करून ज्याठिकाणी पाण्याची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, अशा ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत सांगितले.
या बैठकीला जलसंपदा, बावनथडी प्रकल्प, चांदपूर जलाशय, पाणीपुरवठा, मुख्यमंत्री पेयजल योजना, पीक विमा योजना, अवकाळी पाऊस, भूसंपादन, अतिक्रमण याचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Fix problems of Bavanthadi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.