प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापन तंत्र आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:47 PM2018-12-17T22:47:06+5:302018-12-17T22:47:26+5:30

अतिवृष्टी, पूर किंवा आग एवढीच आपत्तीची व्याख्या नसून अपघात, आजार यासारख्या अनेक बाबी आपत्तीमध्ये असतात. वेळेवर मदत न मिळाल्यास जीवतहानी होऊ शकते. अशावेळी नागरिकास आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र माहित असल्यास आपत्तीग्रस्त नागरिकाचे जीवन वाचविणे शक्य होते.

Everyone should realize the disaster management system | प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापन तंत्र आत्मसात करावे

प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापन तंत्र आत्मसात करावे

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : भंडारा येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अतिवृष्टी, पूर किंवा आग एवढीच आपत्तीची व्याख्या नसून अपघात, आजार यासारख्या अनेक बाबी आपत्तीमध्ये असतात. वेळेवर मदत न मिळाल्यास जीवतहानी होऊ शकते. अशावेळी नागरिकास आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र माहित असल्यास आपत्तीग्रस्त नागरिकाचे जीवन वाचविणे शक्य होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने जिल्हाभर कार्यशाळा घेवून आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र नागरिकांना समजावून सांगितले. हे प्रत्येक नागरिकाने आत्मसात केल्यास आपत्ती व्यवस्थापनास मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, तहसिल कार्यालय भंडारा व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनावर जिल्हाभरात कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळेचा समारोप सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात झाला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरिक्षक प्रमोद लोखंडे, तहसिलदार अक्षय पोयाम व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.
आपत्ती ही सांगून येणारी घटना नसून अचानक उदभवणारी परिस्थिती असते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी सदैव सुसज्ज रहाणे अत्यंत गरजेचे आहे. कुठली आपत्ती केव्हा उदभवेल याचा भरवसा नसल्याने आपत्तीच्या व्यवस्थापनाची तयारी असणे गरजेचे आहे. विशेषत: अतिवृष्टी, पूर व अपघात या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते, अशा वेळी नागरिक प्रशिक्षित असणे महत्वाचे आहे. या कार्यशाळेदरम्यान नागरिकांना प्रशिक्षण देण्यामागचा हाच हेतु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आपत्तीपूर्व, आपत्तीमध्ये आणि आपत्तीनंतर या तीन टप्प्यावर मोठया प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. विशेषत: अपघात झाल्यानंतर प्रथमोपचार व वैद्यकीय मदतीसाठी नागरिकांची आवश्यकता भासत असून प्रशिक्षित नागरिक असल्यास अपघातग्रस्त व्यक्तिला जीवनदान देण्यास मोठी मदत होते. नागरिकांनी आपत्तीचे प्रशिक्षण घेवून इतरांना सुध्दा प्रशिक्षित करावे. जेणेकरुन आपत्तीमध्ये सवार्ची मदत उपयोगी पडेल, असे ते म्हणाले. रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून अपघातानंतर मदत करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तिंची कमी नेहमीच जाणवते असे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू म्हणाल्या, नागरिकांनी कुठलीही भिती किंवा आपल्यामागे पोलीसांचा ससेमिरा लागेल ही भावना मनात न ठेवता अपघात झालेल्या व्यक्तिस तातडिने मदत करावी.
मदत करणाºया व्यक्तिस पोलीसांकडून कुठलाही त्रास दिला जाणार नाही किंवा चौकशीस बोलावले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, असे त्यांनी सांगितले. अपघाताची माहिती नागरिकांनी न भिता पोलीसांना कळवावी व आपले कर्तव्य समजून अपघातग्रस्त व्यक्तिस मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने विविध प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली. संचालन अभिषेक नामदास यांनी केले.उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मानले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने सातही तालुक्यात कार्यशाळा घेवून शेकडो विद्यार्थी व नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: Everyone should realize the disaster management system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.