देशाचे भविष्य तरुणांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:29 AM2017-07-29T00:29:06+5:302017-07-29T00:29:42+5:30

संगणक हे जगातील ज्ञानाची खिडकी आहे. त्या ज्ञानाचा शोध घेऊन अभ्यासूवृत्ती निर्माण करणे गरजेचे आहे.

daesaacae-bhavaisaya-taraunaancayaa-haatai | देशाचे भविष्य तरुणांच्या हाती

देशाचे भविष्य तरुणांच्या हाती

googlenewsNext
ठळक मुद्देमनोज सूर्यवंशी : लोकमत स्पर्धा परिक्षा लेखमालेचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संगणक हे जगातील ज्ञानाची खिडकी आहे. त्या ज्ञानाचा शोध घेऊन अभ्यासूवृत्ती निर्माण करणे गरजेचे आहे. खºया अर्थाने भारताचे भविष्य तरुण पिढीच्या हातात आहे. संयम ठेऊन एकाग्रचित्ताने अभ्यास केल्यास कुठल्याही स्पर्धा परिक्षेत हमखास यश मिळू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले.
लोकमतमध्ये प्रकाशित स्पर्धा परीक्षाविषयक लेखमालेच्या विमोचनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रम भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात शुक्रवारला सकाळी आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे होते. विशेष अतिथी म्हणून तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, जिल्हा माहिती अधिकारी रविकुमार गीते, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.राहुल मानकर, प्रा.किरणकुमार वसानी उपस्थित होते.
यावेळी डॉ.ढोमणे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी कधीही शॉर्टकटचा वापर करु नका. चिकाटीने व मेहनतीच्या बळावर विद्यार्थ्यांनी आशावाद दृष्टीकोनातून यश प्राप्त करावा. सामाजिक बांधिलकी लोकमत समुहाने जपली आहे, ती वाखाणन्याजोगी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी एसडीपीओ विक्रम साळी म्हणाले, प्रशासकीय सेवेत यायचे असेल तर आतापासूनच विद्यार्थ्यांनी तयारीला लागले पहिजे. आपल्या अनुभवातून साळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमपीएससी, युपीएससी, स्टॉफ सिलेक्शन, बँकीग व अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविणे कठिण असले तरी ते अशक्य मात्र मुळीच नाही. केवळ प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित स्पर्धेच्या जगातील या लोकमत वृत्तपत्रातील स्पर्धा परिक्षा सदराचे विमोचन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. संचालन जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर परसावार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सोनु शर्मा यांनी केले. या कार्यक्रमासाठी लोकमतचे प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, वितरण प्रतिनिधी विजय बन्सोड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, कर्मचारी रमेश सेलोकर यांनी सहकार्य केले.

Web Title: daesaacae-bhavaisaya-taraunaancayaa-haatai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.