राज्यघटनेमुळे देशाची अखंडता अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:56 PM2018-01-17T23:56:58+5:302018-01-17T23:59:09+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक प्रबोधनाच्या चळवळीतील विसाव्या शतकातील विचारवंत होते. वैज्ञानिक दृष्टीकोन हा आंबेडकरी चळवळीचा पाया आहे.

The Constitution prevails the integrity of the country | राज्यघटनेमुळे देशाची अखंडता अबाधित

राज्यघटनेमुळे देशाची अखंडता अबाधित

Next
ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : शहापूर येथील भीम मेळावा, दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल, शेकडो बांधवांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमत
शहापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक प्रबोधनाच्या चळवळीतील विसाव्या शतकातील विचारवंत होते. वैज्ञानिक दृष्टीकोन हा आंबेडकरी चळवळीचा पाया आहे. मानसाला वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी त्यांनी प्रवृत्त केले. त्यामुळेच भारतीय लोकांमध्ये फार मोठ्या वैचारिक मंथनाला सुरुवात झाली. अंधाराला चिरणारा सुर्य अधिक तेजस्वी केला. मानवी स्वातंत्र्याचा एकही भाग त्यांच्या सम्यक दृष्टीतून सुटला नाही. त्यांनी देशाला दिलेल्या राज्य घटनेमुळेच देशाची अखंडता कायम असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले.
भीम मेळावा पंचकमेटी व बौध्द विहार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात सुरु झालेल्या शहापूर येथील ऐतिहासीक ७४ व्या भीम मेळाव्याच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते.
बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने भीम मेळाव्याचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारपीठावर प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंकर खोब्रागडे, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. एफ. कोचे, सेवानिवृत्त बँक अधिकारी बी. एस. गजभिये, उद्योगपती गजानन डोंगरवार, सरकारी वकील अमर चवरे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजकुमार राऊत, दर्शन भोंदे, देवीदास नेपाले, गणेश हुकरे, उपसरपंच किरण भुरे, चन्नेश्वर रामटेके, राजविलास गजभिये, सुरेश गजभिये, दुर्योधन खोब्रागडे, माजी शिक्षणाधिकारी डोंगरे, आयपीआय चे जिल्हाध्यक्ष आसित बागडे, भारिपचे जिल्हाध्यक्ष रंजित कोल्हटकर, पिरीपा चे जिल्हाध्यक्ष मदनपाल गोस्वामी, अरुण गोंडाणे, कविता पाटील आदी उपस्थित होते.
मेळाव्या प्रसंगी संयोजक मोरेश्वर गजभिये हे जनतेतून थेट सरपंच पदावर निवडून आल्याबद्दल महिला मंडळ भीम मेळावा पंचकमेटी व बौध्द विहार ट्रस्टच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रा. जोगेंद्र यांनी, राज्य घटना बदलविण्याची भाषा करणाऱ्यांची गय करण्यात येणार नाही. आपल्या भाषणात आरएसएसचा जातीयवादी शक्ती असा उल्लेख करताना सरकारच्या दुटप्पी धोरणावरही निशाना साधला. भिमा कोरेगावच्या घटनेवर भाष्य करताना संभाजी भिडे यांचा दंगलखोर म्हणून उल्लेख केला. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम धर्माथ लोक करीत आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिका संघटीत व्हा, संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणूकीची आठवण त्यांनी केली. राज्य घटनेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. संविधान टिकविण्याचे आवाहन करतानाच आपल्या जीवनात त्रिशरण, पंचशिल, आर्यआष्टयांगिक, दहा पारोमिता व बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी डॉ. शंकर खोब्रागडे, महेंद्र गडकरी, गजानन डोंगरवार, अ‍ॅड. अमर चवरे, चन्नेश्वर रामटेके, रंजित कोल्हटकर, बी. एस. गजभिये, आसित बागडे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
सकाळी भिक्खुनी संघप्रिया व भिक्खु संघ यांच्याद्वारा त्रिरत्न वंदना करण्यात आली. बौध्द विहाराच्या प्रांगणात ठाणेदार अजाबराव नेवारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. एफ. कोचे यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांना मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच मोरेश्वर गजभिये, उपसरपंच किरण भुरे, पोलीस पाटील धम्मपाल सुखदेवे, सोसायटी उपाध्यक्ष भीमराव भुरे, तंमुस अध्यख संजय गजभिये, सोसायटी अध्यक्ष मुकुंदा सेलोकर, अ‍ॅड. अमर चवरे, प्रकाशबाबू गजभिये, सुरेश गजभिये, राजेश डोरले, तेजेंद्र अमृतकर, अनिमोल गजभिये, नितेश गजभिये, शालू भुरे, छाया घरडे, सिमा खोब्रागडे, रिना गजभिये, अल्का पाटील, एम. आर. राऊत, डोंगरे आदी उपस्थित होते. दिवारु वासनिक यांचे तर्फे भोजनदान वितरीत केल्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने समता रैली काढण्यात आली. डॉ. आंबेडकराच्या जयघोषाने व भीम गीतानी शहापूर दणाणून गेले.
यावेळी बौध्द धर्मीय वधु-वर परिचय मेळावा, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, बुध्दभीम गीताचे सादरीकरण व चित्रमालेचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाश कळमकर व अंजली भारती यांच्या भीम बुध्दावर आधारित मराठी, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी संयोजक मोरेश्वर गजभिये, मनोज चवरे, अशोक भिवगडे, जगदिश डोंगरे, तिर्थराज दुपारे, मिलिंद खोब्रागडे, देवेंद्र रामटेके, तोताराम मेश्राम, रत्नघोष हुमने, गणेश वाहणे, प्रशांत मेश्राम, योगेश गजभिये, वृषभ गजभिये, अभिजित वासनिक, शालिकराम मेश्राम, प्रकाशबाबू गजभिये, पांडुरंग बेलेकर यांच्यासह भीम मेळावा पंचकमेटी व बौध्द विहार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. भीम मेळाव्याचे अहवाल वाचन मोरेश्वर गजभिये यांनी केले. तर संचालन अमृत बन्सोड व आभार शालिकराम मेश्राम यांनी मानले.

Web Title: The Constitution prevails the integrity of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.