काँग्रेस करणार कर्जमाफीचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:25 PM2018-06-27T22:25:19+5:302018-06-27T22:25:37+5:30

मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

Congress will release the loan waiver | काँग्रेस करणार कर्जमाफीचे वर्षश्राद्ध

काँग्रेस करणार कर्जमाफीचे वर्षश्राद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देनाना पटोले : यवतमाळ येथून २८ जूनपासून आंदोलनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा वर्षश्राद्ध करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाला प्रारंभ करण्यात येत आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी पटोले म्हणाले, सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची रूपरेखा आखली आहे. याची सुरुवात यवतमाळ येथून गुरूवारपासून होत आहे. १ जुलै रोजी अकोला, २ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील शहापूर असे येत्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
मागील चार वर्षाच्या कार्यकाळात जिथे दुष्काळ पडला तिथे मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांना मदत दिली नाही. त्या शेतकºयांना सरसकट मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची तारीख ३० जूनपर्यंत वाढविली असून हे सरकार समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.
पत्रपरिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेमदास वनवे, जि.प. सदस्य आकाश कोरे, माजी सदस्य रमेश पारधी, भरत खंडाईत उपस्थित होते.
पीकविमा ऐच्छिक असला पाहिजे
शेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम सक्तीने वसूली करू नका. सक्तीच्या पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे पीकविमा योजना ऐच्छिक असला पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांप्रमाणे १० हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी हा खरा देशभक्त असून या शेतकºयांना वृद्धापकाळात १० हजार रूपये पेन्शन देण्याची खरी गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Web Title: Congress will release the loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.