गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 12:22 AM2017-07-17T00:22:01+5:302017-07-17T00:22:01+5:30

इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे.

Complete the tunnel work of Gosekhurd project | गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण

गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण

googlenewsNext

धरणाची पातळी २४१.२०० मीटरवर : दोन वक्रद्वारे उघडली, डाव्या, उजव्या कालव्यात पाणी सोडले
प्रकाश हातेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे. डावा, उजव्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले असून धरणाची दोन वक्रद्वारे अर्ध्या मीटरने उघडले आहेत.
२२ एप्रिल १९८८ मध्ये गोसे धरणाची निर्मिती झाली पायथ्याजवळ पाणी वाहुन जाण्याकरिता चार भुमिगत बोगदयाची ‘कडूळ’ निर्मिती करण्यात आली होती आज हे प्रकल्पपूर्ण पणे तयार असून शासनाने पाणी अडविल्याची भुमिका घेतल्याने सर्वत्र जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाचे २४२ मीटरचा दुसरा टप्पा अर्थात २० टीएमसी उद्दिष्ट पूर्ण केले गेले होते. यावर्षी त्यात वाढ करुन २४२.५०० मीटरपर्यंत जलसाठा साठविण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या गेट क्रमांक ८, ९, १० वरील चार भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्याने धरणातील जलसाठा टप्पाटप्प्याने कमी केले होते. तर धरणाचे ३३ वक्रद्वारे बंद केले असून आवश्यकतेनुसार पाणी ८ ते १० दिवसानी सोडले जात होते व कंडूळ बोगद्याचे कामे वक्रद्वाराने पाणी अडवून बोगद्याची कामे युध्दपातळीवर सुरु होती. ते चारही (कंडूळ) बोगद्याची कामे पुर्ण झाली असून धरणाची गेट क्र. १ व ३३ अर्ध्या मिटरने उघडले आहेत. सध्या स्थितीत प्रकल्पात पाण्याचा साठा २४१.२०० मीटर आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने रोवणी पावसाअभावी रखडल्याने प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या पॉवर हाऊसची कामे अंतीम टप्प्यात आली असून धरणाच्या पोटातील कामे सुरु आहेत त्या पॉवर हाऊसच्या कामासाठी पुन्हा पाण्याची पातळी कमी करण्यात येणर आहे. पावर हॉऊसची पूर्ण कामे झाल्यावर डिसेंबर २०१७ ला धरणाचे संचयन पातळी गाठणार आहे.

रोवणी होईपर्यंत कॅनल सुरु ठेवा
गोसेखुर्द परिसरातील १० किमी पर्यंतच्या गावाला या प्रकल्पात शासनाने पाणी अडविणे सुरु केले तेव्हापासून अल्प पाऊस पडत असल्याने चार वर्षा पासुन निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची रोवणी होत नाही आहेत. त्यामुळे डाव्या कालव्यात सोडलेले पाणी रोवणी होईपर्यंत बंद करु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू
धरणाची कामे होताच पाणी अडविण्याची भुमिका शासनाने घेतली नदी काठावरील प्रकल्पग्रस्तांना गावे सोडावी लागली. मात्र बोगदयाचे कामाला धरण खाली केल्याने जुने गावाचे दर्शन झाले असून गावातील रस्ते, मंदिरे, चौकटीवरील वटवृक्ष पडलेली घरे या गावात गेलेले बालपण जुन्या आठवणी निर्माण करित असून प्रकल्पग्रस्तांची डोळे पाणावली आहेत. पुन्हा शासनाने पाणी साठवणूक केल्याने आठवणीवर पांघरुन झाकले गेले आहे.

Web Title: Complete the tunnel work of Gosekhurd project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.