जीवनातील कविता आणि कवितेतील जगणे दोन्ही अवघडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:09 AM2017-11-15T00:09:02+5:302017-11-15T00:09:19+5:30

कविता हाच माझा श्वास, ध्यास आणि माझे आत्मरूप असले तरी कवितेची प्रक्रिया साधी सोपी नाही़ माझ्या जगण्यात कवितेचे असणे आणि प्रत्यक्ष कवितेतील माझे जगणे या दोन्ही बाबी विलक्षण अवघड आहेत,.....

Both life's poems and poetry are difficult to live in | जीवनातील कविता आणि कवितेतील जगणे दोन्ही अवघडच

जीवनातील कविता आणि कवितेतील जगणे दोन्ही अवघडच

Next
ठळक मुद्देपद्मरेखा धनकर : ‘कवी आणि कविता’ उपक्रमाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कविता हाच माझा श्वास, ध्यास आणि माझे आत्मरूप असले तरी कवितेची प्रक्रिया साधी सोपी नाही़ माझ्या जगण्यात कवितेचे असणे आणि प्रत्यक्ष कवितेतील माझे जगणे या दोन्ही बाबी विलक्षण अवघड आहेत, असे मार्मिक प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री डॉ़ पद्मरेखा धनकर यांनी ‘कवी आणि कविता’ या कार्यक्रमातील मुलाखतीत बोलताना व्यक्त केले़
युगसंवाद वाड्मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडारा, विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा, सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथे संपन्न झालेल्या ‘कवी आणि कविता’ या उपक्रमाच्या बाराव्या समारोपीय काव्य सोहळ्यात डॉ़ पद्मरेखा धनकर निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाल्या होत्या.़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी डॉ़ राजन जयस्वाल होते़ तर प्रमुख अतिथी म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल उपस्थित होते़.
याप्रसंगी डॉ़ पराग डहाके, विदर्भ साहित्य संघाचे भंडारा शाखेचे कार्यकारी सदस्य ताराचंद ठवकर आणि साहित्य क्षेत्रातील अलीकडेच दिवंगत झालेल्या लेखक, कवी, कलावंताना श्रद्धांजली वाहण्यात आली़ उद्घाटन सत्रानंतर चंद्रपुरचे सुप्रसिद्ध निवेदक-कवी इरफान शेख यांनी डॉ़ पद्मरेखा धनकर यांची प्रकट मुलाखत घेतली़
या मुलाखतीत धनकर यांनी आपले आयुष्य आणि आपली कविता समांतर व परस्परपूरक असल्याचे मत मांडले़ आयुष्यातील दु:खांनी आणि धाडसी निर्णयांनी कधीकाळी खूप छळले असले तरी त्याच दु:खांनी मला आणि कवितेला खूप समृद्धही केले आहे, असे त्या मुलाखतीचे उत्तर देतांना म्हणाल्या़ डॉ़ धनकर यांच्या लौकीक आणि वाड्मयीन जीवनातील अनेक प्रश्नोत्तरांमुळे ही मुलाखत रंगतदार झाली़
मुलाखतीनंतर डॉ़ पद्मरेखा धनकर यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन झाले़ त्यांनतर प्रा़ रेणुकादास उबाळे आणि पवन कामडी यांनी धनकरांच्या कवितेतील काव्यालंकार गुणांचे सविस्तर विवेचन केले़ समारंभाध्यक्ष डॉ़ राजन जयस्वाल यांनी पद्मरेखा धनकरांच्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या जडणघणीवर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले़
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ़ इंद्रजित ओरके आणि विदर्भ साहित्य संघाचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, काशिनाथ ढोमणे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष डॉ़ गुरूप्रसाद पाखमोडे यांनी केले़ संचालन डॉ़ सुरेश खोब्रागडे यांनी केले. तर आभार प्रमोदकुमार अणेराव यांनी मानले़
याप्रसंगी प्रसिद्ध कवी लखनसिंह कटरे, युवराज गंगाराम, डॉ़ गिरीश सपाटे, सी़ एम़ बागडे, वसंत चन्ने, डॉ़ जयंत आठवले, हरिभाऊ मोहतुरे, प्रा़ भगवंत शोभणे, डॉ़ के़ एल़ देशपांडे उपस्थित होते़ कार्यक्रमासाठी युगसंवादचे सचिव प्रा़ नरेश आंबीलकर, बासप्पा फाये, अमृत बन्सोड, हर्षल मेश्राम, डॉ़ जगजीवन कोटांगले, मनोज सुमित्रा, विवेक कापगते, वाचनालयाचे ग्रंथपाल कानतोडे, खोब्रागडे, साठवणे यांनी सहकार्य केले़ काव्य सोहळ्यात नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गोंदिया, लाखनी, साकोली, पवनी, आमगाव येथील काव्यप्रेमी, रसिक उपस्थित होते़

Web Title: Both life's poems and poetry are difficult to live in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.