विषारी गोळे खाल्ल्याने १५ शेळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:57 PM2018-03-17T22:57:50+5:302018-03-17T22:57:50+5:30

गोसेखुर्द प्रकल्प परिसरात चिचाळ शेतशिवारातील बुडीत परिसरात कनकीचे विषारी गोळे खाल्ल्याने १५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना १७ मार्चच्या दुपारी २.३० वाजता दरम्यान घडली.

15 goats death due to eating poisonous balls | विषारी गोळे खाल्ल्याने १५ शेळ्यांचा मृत्यू

विषारी गोळे खाल्ल्याने १५ शेळ्यांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देचिचाळ येथील घटना : काही शेळ्या गंभीर

आॅनलाईन लोकमत
चिचाळ : गोसेखुर्द प्रकल्प परिसरात चिचाळ शेतशिवारातील बुडीत परिसरात कनकीचे विषारी गोळे खाल्ल्याने १५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना १७ मार्चच्या दुपारी २.३० वाजता दरम्यान घडली. या घटनेची तक्रार अड्याळ पोलीस ठाणे व वनक्षेत्राधिकारी कार्यालयाला केली आहे.
चिचाळ येथील लंकेश्वर रामटेके हे शेळ्या पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे स्वत:चे १५ शेळ्या व व गावातील २० शेळ्या राखतात. शनिवारला सकाळी ११ वाजता ते नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन गेला. २.३० वाजताच्या दरम्यान चकारा - चिचाळ मार्गाशेजारील बुडीत क्षेत्रातील शिवारात शेळ्यांनी खाली शेतात रानटी डुकरांसाठी मांडून ठेवलेले कनकीचे विषारी गोळे खाल्ल्याने शेळ्या तहानेने व्याकूळ होवून सैरावैरा पळावयास लागल्या तर काही शेळ्या जागीच ठार झाल्या. संपूर्ण शेतशिवारात शेळ्या अनेक ठिकाणी मृत्यू पडल्या तर काही शेळ्या घरी येवून मृत्यू पावल्या. काही शेळ्यावर उपचार सुरु असून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लंकेश्वर रामटेके, नेपाळ बिलवणे, बक्षी नेवारे, भगवान नेवारे, शेगोजी नान्हे, शशिकांत रामटेके, कैलाश दिघोरे, गिरीधर नखाते, प्रविण लेदे, सुरेश मेश्राम, अजय उके आदीच्या शेळ्या मृत्यू पावल्या आहेत. तर काही शेळ्या शेवटची घटका मोजत आहेत. याची चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: 15 goats death due to eating poisonous balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.