१०,३५७ बालकांना 'आधार' नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 09:24 PM2017-10-08T21:24:16+5:302017-10-08T21:24:28+5:30

शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च २०१६ पासून हाती घेण्यात आली. सप्टेंबर २०१७ अखेरपर्यत जिल्ह्यातील एकूण १,३०५ अंगणवाडीमधील.....

10,357 children do not have 'support' | १०,३५७ बालकांना 'आधार' नाही

१०,३५७ बालकांना 'आधार' नाही

Next
ठळक मुद्दे० ते ५ वयोगट : मोहीम थंडबस्त्यात, नोंदणीची प्रतीक्षा

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च २०१६ पासून हाती घेण्यात आली. सप्टेंबर २०१७ अखेरपर्यत जिल्ह्यातील एकूण १,३०५ अंगणवाडीमधील ७२ हजार ४२० बालकांपैकी सुमारे ६२ हजार ६३ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले. अद्यापही १० हजार ३५७ बालकांना आधार नोंदणीची प्रतीक्षा आहे.
शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्याची मोहीम केंद्र शासनाने मागील पाच ते सहा वर्षांपासून सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. शासकीय योजनांचा लाभ घेणाºया प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड सक्तीचे केल्याने नागरिकही स्वत:हून आधार कार्ड काढत आहेत. त्याचबरोबर शहरासह ग्रामीण भागातही केंद्राची स्थापना करून आधार कार्ड काढले जात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १२ लाख एवढी आहे. त्यापैकी ९४ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. राज्यभरातही जवळपास ८८ टक्के नागरिकांना आधार कार्ड मिळाले आहेत.
नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर शासनाने ० ते पाच या वयोगटातील अंगणवाडीमध्ये शिकणाºया बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च २०१६ पासून सुरू केली. मागीलवर्षी धडाक्यात माहिमेला सुरुवात केली असली तरी यावर्षी मात्र ही मोहिम थंडबस्त्यात आहे. संपूर्ण बालकांचे जून महिन्यापर्यत आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागत आहे. आतापर्यत केवळ ८५.७० टक्के बालकांची आधार नोंदणी झालेली आहे. नव्याने जन्म झालेल्या बालकांची आधार नोंदणी न झाल्यामुळे उद्दिष्टपूर्ती झालेली नाही.
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याबद्दल निर्देश नाही
अंगणवाडीतील बालकांसोबतच पहिली ते दहाव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढावे लागणार आहेत. प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक बालकाला आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. मात्र याबद्दल कोणतेही अधिकृत पत्र महिला बालकल्याण विभागाला अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही.
पर्यवेक्षिका करणार बालकांची आधार नोंदणी
मागीलवर्षी धडाक्यात सुरुवात झालेली बालकांची आधार नोंदणी मात्र यावर्षी थंडबस्त्यात आहे. त्यामुळे जन्म झालेल्या बालकांसह ५ वर्षापर्यतच्या बालकांची नोंदणी यापुढे थेट जिल्ह्यातील १,३०५ अंगणवाडी केंद्रात केली जाईल. यासाठी पर्यवेक्षीकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर बालकांची आधार नोंदणीचे कार्य पर्यवेक्षीका सांभाळणार आहेत.
बालकांसोबतच ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्य
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन काही ठिकाणी आधार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. बालकांसोबतच इतरही नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत. अंगणवाडी केंद्रांमध्ये ही मोहिम राबविण्यात येत नसल्यामुळे बालकांचे आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झालेले नाही.

Web Title: 10,357 children do not have 'support'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.