प्रेमप्रकरणातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:26 AM2018-12-20T00:26:37+5:302018-12-20T00:27:08+5:30

बहिणीसोबत प्रेम करून नंतर विवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.

Youth's murder through love | प्रेमप्रकरणातून युवकाचा खून

प्रेमप्रकरणातून युवकाचा खून

Next
ठळक मुद्देबीडमधील तेलगाव नाक्यावरील थरार : मुलीचा भाऊ व त्याच्या मित्राने धारदार शस्त्राने केले सपासप वार

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बहिणीसोबत प्रेम करून नंतर विवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती. दरम्यान जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी हंबरडा फोडला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
सुमित वाघमारे (वय २५, रा. तालखेड, ता. माजलगाव ह. मु. नागोबा गल्ली, बीड) असे मयताचे नाव आहे. सुमित हा आदित्य इंजिनिअरींग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. याच वर्गात सदर मुलगी शिकत होती. या दोघांची मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम आणि नंतर दीड महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. हा विवाह तिच्या भावाला खटकला होता. त्यामुळे त्याच्या मनात सुमितबद्दल राग होता. याबाबत त्यांच्यात अनेकदा वादही झाले. बुधवारी सदर मुलगी व तिचा पती सुमित दोघहीे परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या कारमधून
(एमएच २३ - ३२५३) तिचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत (पूर्ण नाव कळू शकले नाही) हे दोघे आले व कारमधून उतरत त्यांनी सुमितवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले, असे सदर मुलीने संगितले. ओरडत तिने मदतीची मागणी केली, दरम्यान एका रिक्षाचालकाने धाव घेत सुमितला रिक्षात घालून जिल्हा रूग्णालयात आणले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला असल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ही माहिती वाºयासारखी नातेवाईक व मित्रांना समजली. त्यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली. सुमितची पत्नी, आई व मावशीने रूग्णालयात आल्यावर हंबरडा फोडला. यामुळे वातावरण सुन्न झाले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद पेठ बीड ठाण्यात झालेली नव्हती.
तालखेडमध्ये गाव जेवण
मुलीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने त्यांनी ‘कोर्ट मॅरेज’ केले. त्यानंतर तालखेडला गावी जात ग्रामस्थांना जेवण दिले. त्यानंतर ते पुन्हा बीडमध्ये वास्तव्यास आले. सुमित हा जालना रोडवरील एका दुकानात कामाला.
आरोपींच्या शोधात पथके
घटनेनंतर पेठबीड, शिवाजीनगर आणि शहर पोलिसांचे पथक नियुक्त केले. ते तात्काळ आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. रात्री ७.३० पर्यंत आरोपी मिळालेले नव्हते. आरोपींना लवकरच अटक करू, असे उपअधीक्षक खिरडकर यांनी सांगितले.

Web Title: Youth's murder through love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.