वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्य निर्माण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:15 AM2018-11-05T00:15:40+5:302018-11-05T00:16:10+5:30

सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.

The Warkari community created social unity | वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्य निर्माण केले

वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्य निर्माण केले

Next
ठळक मुद्देपाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : सातशे वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली. त्यामुळे वारकरी सांप्रदाय महान आहे, असे मौलिक विचार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. ते अंबाजोगाईत आयोजित कीर्तन महोत्सवात बोलत होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनाने पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता झाली. यावेळी लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या महाप्रसादाने झाली.
यावेळी सातारकर महाराज म्हणाले, संत तुकोबारायांनी ‘योगिया मुनी जनार्दन’ या अभंगातून वारकरी सांप्रदायाला व भक्तजनांसाठी जीवन जगण्याचा सुंदर संदेश सरळ, सोप्या भाषेत दिला. वृत्तीमध्ये लिनता असली की, जगाला तो माणूस आवडू लागतो, त्यामुळे भेदाभेद पाळू नका, सर्वांना समान माना, आई-वडीलांची सेवा करा, गुरूंचा आदर करा, जबाबदारी ओळखा चांगला माणूस म्हणून जगा असे आवाहन त्यांनी केले.
आज नव्या पिढीला माता पिता नकोत पण, त्यांचा पैसा हवा आहे. कुटुंबात संवाद ठेवा, कारण, जुळवून घेणाऱ्याचाच संसार टिकतो, घरातच नव्हे तर समाजातही ऐक्य हवे, असे सातारकर महाराज म्हणाले. महोत्सवात चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवती यांचे कीर्तने झाली. तत्पूर्वी महोत्सवाच्या चौथ्या व आदल्या दिवशी चिन्मय महाराज यांचे कीर्तन झाले.
प्रारंभी आयोजक बबनराव आपेट व परिवाराच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मुकुंदराज संस्थानाचे पवार महाराज व शिंदे महाराज, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सभापती मधुकर काचगुंडे, राम कुलकर्णी, मेघराज आपेट, विठ्ठलराव आपेट, प्रभु मारूती आपेट, रंजना बाभुळगावकर, उत्तमराव बावणे, दत्तात्रय जाधव, गिरी महाराज, जनार्दन मुंडे, प्रकाश आपेट, दिनकर आपेट, धनंजय कापसे, नागनाथ तोडकरसह गिरवलीचे सर्व ग्रामस्थ, महिला, वारकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The Warkari community created social unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.