माजलगाव तालुक्यात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:02 PM2018-12-11T14:02:05+5:302018-12-11T14:03:42+5:30

खाजगी बँकेच्या कर्जाच्या त्रासाला कंटाळून एका 36 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली

Suicides of young farmers by taking sledge in Majalgaon taluka | माजलगाव तालुक्यात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

माजलगाव तालुक्यात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next

माजलगाव (बीड ) : खाजगी बँकेच्या कर्जाच्या त्रासाला कंटाळून एका 36 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली. ही घटना तालुक्यातील साळेगाव कोथळा येथे सोमवारी रात्री उशिरा घडली असून सिरसाळा पोलिसांत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साळेगाव कोथळा येथील कुंडलिक देवराव गवळी या 36 वर्षीय शेतकरी युवकाकडे खाजगी बँकेचे कर्ज होते. नापिकीमुळे शेतात उत्पन्न होत नसल्याने सदरील बँकेचे कर्ज वाढत होते.  दरम्यान, कर्जफेडीसाठी बँकेचा तगादा वाढत होता.त्यातच घरची परिस्थिती नाजूक होती.या घालमेलीत मानसिक त्रासाला कंटाळून कुंडलिक गवळी या युवकाने सोमवारी रात्री साळेगाव कोथळा येथील शिवारात स्वतःच्या शेतात सोमवारी रात्री लिंबाच्या झाडाला फाशी घेतल्याची घटना घडली. दरम्यान मृत्यूपूर्व लिहिलेल्या पत्रात आपण कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बाबत सिरसाळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Web Title: Suicides of young farmers by taking sledge in Majalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.