अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा शिवारात स्पार्किंगमुळे १२ एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:47 AM2018-02-05T00:47:27+5:302018-02-05T10:30:15+5:30

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा शिवारातील ईश्वर लोहिया या शेतकºयाचा बारा एकर ऊस विद्युत पुरवठा तारांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक झाला. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

Sparking 12 acres of sugarcane | अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा शिवारात स्पार्किंगमुळे १२ एकर ऊस खाक

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा शिवारात स्पार्किंगमुळे १२ एकर ऊस खाक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील पाटोदा शिवारातील ईश्वर लोहिया या शेतकºयाचा बारा एकर ऊस विद्युत पुरवठा तारांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक झाला. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

मागच्या चार - पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती नंतर गतवर्षीपासून निसर्गाने साथ दिल्यानंतर ऊस उत्पादक पट्टयात उसाची लागवड झाली होती. पाटोदा शिवारात होळना नदीच्या काठी ईश्वर लोहिया या शेतकºयाचा बारा एकर तोडणीसाठी आलेला ऊस उभा होता. याच उसाच्या शेतातून विद्यूत पुरवठा करणाºया तारा गेल्या आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे या तारा लोंबकळल्या आहेत.

शनिवारी दुपारीही अचानक वारा सुटल्याने या लोंबकाळणाºया तारांची स्पार्किंग झाली आणि ठिणग्या उसात पडल्या. पाहता पाहता १२ एकर उभा उस जळून खाक झाला. यामध्ये लोहिया यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Sparking 12 acres of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.