मराठवाड्यातील पोलीस प्रथम क्रमांकावर असतील-सिंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:15 AM2019-09-26T01:15:13+5:302019-09-26T01:16:11+5:30
औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचा समारोप औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय पलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचा समारोप औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. तसेच त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी चांगले काम करत आहेत. पुढील काही काळात राज्यात मराठवाड्यातील पोलीस सर्व बाबींमध्ये अव्वल असेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच बीड पोलिस दलाने केलेल्या नियोजनाचे देखील कौतुक केले.
यावेळी बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, जालना पोलीस अधीक्षक एस.चौतन्य, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, सर्व पोलीस उपअधीक्षक व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन २१ ते २५ सप्टेंबर या कालावधिमध्ये करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये ११ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तसेच ४७२ पोलीस कर्मचारी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दरम्यान या क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन बीड पोलिसांनी केले होते. याचे देखील कौतुक पोलीस महानिरीक्षक यांनी केली.
पुढे बोलतना डॉ.सिंगल म्हणाले बीड पोलीस दलाने या स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे सर्वबाजून आरोग्य चांगले राहवे यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोलिसांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घ्यावा व राज्यातील स्पर्धेत देखील यश मिळवावे, क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकणे आणि हारणे या दोन गोष्टी असतात, परंतु खेळात सहभागी होणे सर्वात महत्तवाची बाब आहे त्यामुळे सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे स्वागत महानिरीक्षक डॉ.रवींद्र सिंगल यांनी केले. तसेच सर्वांना शुभेच्छा देत विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा संदेश देखील या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी मानले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
औरंगाबाद ग्रामीण प्रथम
स्पर्धेत ११४६ गुण प्राप्त करत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १२८ गुणांची कमाई तरत औरंगाबाद शहर पोलिसांनी द्वितीय तर बीड पोलिसांनी १०७ गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक मिळवला.
या विजेत्या संघांचा तसेच उत्कृष्ट महिला खेळाडू व पुरुष खेळाडूंचा देखील सन्मान औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवंीद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला.