बीड, जालन्यात धुडगूस घालणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:34 AM2018-04-13T00:34:09+5:302018-04-13T00:34:09+5:30

'Mokka' on Bead, Dhalgos, on a gang | बीड, जालन्यात धुडगूस घालणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

बीड, जालन्यात धुडगूस घालणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाजोगाई विभागात महिनाभर धुमाकूळ; बीड पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खून, दरोडे, लुटमारी, अत्याचार यासारखे गुन्हे करून बीड व जालना जिल्ह्यात धुमाकूळ घालणाºया पाच जणांच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने मागील महिनाभरात अंबाजोगाई विभागात धुमाकूळ घातला होता. यातील सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चालू वर्षातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
बाल्या उर्फ बालाजी पंडित काळे, शाम पवार (रा.वडीगोद्री ता.अंबड जि.जालना), गोविंद शिंदे, हानम्या भोसले (रा.कवडगाव ता.परळी) व अन्य एक अशा पाच जणांचा यामध्ये समावेश आहे. बाल्या हा या टोळीचा म्होरक्या आहे. २८ फेब्रुवारी रोजी परळी तालुक्यातील मांडखेल येथील शिवकन्या मधुकर नागरगोजे या रात्रीच्या सुमारास आपल्या पतीसह दुचाकीवरून (एमएच ४४ ई ९८३५) ताडोळी या गावी जात होत्या. याचवेळी माळहिवराजवळ पांढºया रंगाच्या जीपमधून आलेल्या पाच जणांनी त्यांना ओव्हरटेक करून गाडी आडवी लावली. यावेळी जीपमधून उतरलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दागिने व रोख रक्कम असा ६० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर शिवकन्या नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या टोळीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.चाटे यांनी याचा तपास केला. सुरूवातीला चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर आणखी एक आरोपी निष्पन्न झाला. त्याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला.
या आरोपींना पकडण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलापुढे होते. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद यांनी तात्काळ पथके तयार करून तपासासाठी रवाना केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकालाही कामाला लावले. अखेर यातील सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस दलाला यश आले.
अधीक्षक जी.श्रीधर यांनी या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित नियंत्रण अधिनियम १९९९ प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे या टोळीविरोधात ४ एप्रिल रोजी प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यांच्याकडे तर ९ एप्रिल रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांच्याकडे पाठविला. त्यांनी याला गुरूवारी परवानगी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे व त्यांची टीम, पोलीस निरीक्षक एस.एस.चाटे, सुरेंद्र गंदम यांनी केली.

बाल्या काळेवर विविध गुन्हे
बाल्या काळे हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने आंध्रप्रदेश राज्यात दरोडा, खून यासारखे गंभीर गुन्हे केलेले आहेत. तसेच बीड व जालना जिल्ह्यातही त्याने अनेक गुन्हे केले असून त्याची नोंदही ठाण्यात आहे. मागील अनेक दिवसांपासून तो पोलिसांना हवा होता. दोन दिवसांपूर्वीच त्याला अंबडमधून बेड्या ठोकल्या.
१६ महिन्यांत ९ कारवाया
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यापासून अट्टल गुन्हेगार हद्दपार करण्याबरोबरच टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यावर त्यांनी भर दिला आहे. गत वर्षात ७ टोळ्यांवर तर चालू वर्षात दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये बीड पोलिसांबद्दल दहशत निर्माण झाली आहे.
३ महिन्यांपूर्वीच आला बाहेर
बाल्या हा आंध्र प्रदेशातील कारागृहात होता. तीन महिन्यांपूर्वीच तो बाहेर आला होता. दीड महिना शांत राहिल्यानंतर औरंगाबाद कारागृहातून बाहेर आलेल्या शाम पवारला तो भेटला. पुन्हा ही टोळी एकत्र आली आणि त्यांनी गुन्हे करण्यास सुरूवात केली.
गोविंदपासून गती
सुरूवातीला गोविंद शिंदे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने इतर सहकाºयांची नावे सांगितल्यानंतर एक-एक करून सर्वांच्या मुसक्या बीड पोलिसांनी आवळल्या.
अंबजोगाईतील दरोड्यातही समावेश
अंबाजोगाई शहरात चाकूचा धाक दाखवून एकाच रात्री दोन घरफोड्या केल्या.
त्यानंतर अंबाजोगाई-परळी रस्त्यावर एकाच रात्री तीन जणांना लुटले. पुढे लातूर हद्दीत दोन चोºया केल्या होत्या.
अंबाजोगाई उपविभागातही या टोळीने महिन्यापासून धुमाकूळ घातला होता.
अल्पवयीन असताना बनला दरोडेखोर
गोविंद शिंदे याचा छोटा भाऊ हा सुद्धा या टोळीत आहे. त्याचे वय अवघे १६ वर्षे असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. मोठ्या भावाकडे पाहून तो सुद्धा चोरी, दरोडे टाकू लागला. अखेर या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

Web Title: 'Mokka' on Bead, Dhalgos, on a gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.