केज तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 07:49 PM2018-09-06T19:49:45+5:302018-09-06T19:51:27+5:30

तालुक्यातील भालगाव क्रमांक दोन मध्ये बुधवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घालत तीन घरात चोरी केली.

In kaij, thieves broke three houses at one night | केज तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडली

केज तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडली

Next

केज (बीड ) : तालुक्यातील भालगाव क्रमांक दोन मध्ये बुधवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घालत तीन घरात चोरी केली. यात नगदी रक्कमेसह सोन्याचांदीच्या दागिन्यासह  २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. यासोबतच चोरट्यांनी घरासमोर लावलेली एक बाईक घेऊन पोबारा केला. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील भालगाव क्रमांक दोन येथे बुधवारी मध्यरात्री बारा ते दोन च्या सुमारास  चोरट्यांनी कृष्णा अर्जुन ढोबळे यांच्या घरातील सर्व सदस्य झोपलेल्या घरास बाहेरुन कडी लावून चोरट्यांनी कपाटातील साडेचार तोळ्याचे दागदागिने व पँटच्या खिशातील नगदी ३० हजार,कपडे चोरी केल्या नंतर  चोरट्यांनी आपला मोर्चा सुरेश बाबासाहेब मोरे यांच्या घराकडे वळवत त्यांच्या घरातील कपाटातील दिड तोळ्याचे दागिने व कपड्याची चोरी केल्या नंतर चोरट्यांनी अरुण रावसाहेब ढोबळे यांच्या घरात घुसून दोन अडीच तोळ्याचे दागिने डब्यात ठेवले ५ हजार रुपये व कपड्याची चोरी केली. यानंतर चोरट्यांनी बाळासाहेब अभिमान ढोबळे यांच्या घरासमोर उभा केलेली एमएच -१४ एएल ७८७५ या क्रमांकाची बाईक पळवली. ढोबळे यांच्या आईस बाईक चालु होण्याचा आवाज आल्याने त्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरट्यांनी मोटारसायकल घेऊन पोबारा केला 

या प्रकरणी कृष्णा अर्जुन ढोबळे यांच्या फिर्यादी चोरट्यांनी भालगाव क्रमांक दोन येथे तीन घरात चोरी करून सोन्याचांदीच्या दागिन्यासह नगदी २ लाख ४५  हजाराचा ऐवजासह मोटारसायकल चोरून नेल्या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंधारे करत आहेत.
 

Web Title: In kaij, thieves broke three houses at one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.