शिरूरच्या माजी उपनगराध्यक्ष पुत्राविरोधात अत्याचाराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:29 AM2019-01-11T00:29:31+5:302019-01-11T00:29:53+5:30

माजी उपनगराध्यक्षा आणि नगरसेविका रु कसाना पठाण याचे पुत्र इम्रान पठाण यांच्याविरु द्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The crime of atrocities against son of Shirur's former deputy chief | शिरूरच्या माजी उपनगराध्यक्ष पुत्राविरोधात अत्याचाराचा गुन्हा

शिरूरच्या माजी उपनगराध्यक्ष पुत्राविरोधात अत्याचाराचा गुन्हा

Next
ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारीरिक संबंध

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : माजी उपनगराध्यक्षा आणि नगरसेविका रु कसाना पठाण याचे पुत्र इम्रान पठाण यांच्याविरु द्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षांच्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा इम्रान पठाण याच्यावर आरोप आहे.
शिरूर कासार येथील अत्याचार पीडित तरु णीचे लग्न मुंबई येथील तरु णाबरोबर झाले होते. मात्र, इम्रान आणि सदर तरु णी फोनवरून एकमेकाच्या संपर्कात आले होते. त्यातून पुढे इम्रानने सदर विवाहितेस मोठंमोठी स्वप्ने दाखवून लग्न करण्याचे अमिष दाखिवल्याने सदर विवाहिता लग्नाचा नवरा सोडून इम्रान सोबत शिरुर येथे आली होती. मात्र, येथे येऊन १० महिने झाले तरी इम्रान आपल्याशी विवाह करीत नाही, हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र त्याने लग्नास नकार देऊन शारीरिक छळ करण्यास सुरु वात केली. दि. २७ जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तसेच सासू रु कसाना इसाखाँ पठाण, सासरे इसाखाँ पठाण आणि मामेसासरे जाकीर अकबर पठाण यांनी तरु णीस घरी जाऊन रात्री अपरात्री मारहाण केली.
जातिवाचक शब्द वापरून आमच्या मुलाचे तुझ्याबरोबर लग्न लावून द्यायचे का, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपी विरु द्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The crime of atrocities against son of Shirur's former deputy chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.