मुख्याध्यापकावर हल्ला, बिअरबारसमोर राडा करणारे दोन्ही शिक्षक अखेर निलंबित

By अनिल भंडारी | Published: March 16, 2024 04:29 PM2024-03-16T16:29:10+5:302024-03-16T16:29:45+5:30

वाद झाल्यानंतर मुख्याध्यापकावर बतईने हल्ला करण्यात आला होता. 

Assault on principal over petty dispute; The two teachers who shouted in front of the beer bar were finally suspended | मुख्याध्यापकावर हल्ला, बिअरबारसमोर राडा करणारे दोन्ही शिक्षक अखेर निलंबित

मुख्याध्यापकावर हल्ला, बिअरबारसमोर राडा करणारे दोन्ही शिक्षक अखेर निलंबित

बीड : शाळेतील किरकोळ वादातून मुख्याध्यापकावर बतईने हल्ला करून जखमी करणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गुरूजींचे गैरवर्तन लक्षात घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संतोष गिरी व रघुनाथ नागरगोजे यांना  तडकाफडकी  निलंबित केले आहे. 

गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंबादास मल्हारी नारायणकर (वय ५३, रा. विश्वासनगर, बीड) यांच्यासह  सहशिक्षक घाडके, रघुनाथ नागरगोजे, लक्ष्मण परजणे, संतोष गिरी हे बीडवरून शाळेत दररोज एकाच गाडीतून जातात. १२ मार्च रोजी त्यांच्यात वाद झाल्यानंतर मुख्याध्यापक  नारायणकर  यांच्यावर बतईने हल्ला करण्यात आला होता. 

जिल्हा परिषद शिक्षकांनी धिंगाणा करून गैरवर्तन केल्याने त्यांची कृती जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियमांचा भंग करणारी असल्याने विभागीय चौकशी करण्यासाठी सद्यस्थितीत पदावरून दूर करण्यासाठी संतोष गिरी व रघुनाथ नागरगोजे यांना जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील कलम ३( २) मधील तरतुदीनुसार निलंबित करण्याचे आदेश सीईओ संगितादेवी पाटील यांनी दिले.

Web Title: Assault on principal over petty dispute; The two teachers who shouted in front of the beer bar were finally suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.