४९ ‘मुन्नाभार्इं’च्या दुकानांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:14 AM2019-03-30T00:14:14+5:302019-03-30T00:14:47+5:30

बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी विनापरवाना वैद्यकीय सेवा देऊन सर्वसामान्य रुग्णांची लुट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत ४९ मुन्नाभार्इंवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या दवाखान्यांना कुलूप ठोकले आहे.

49 9 'Munnabhai' shops are closed | ४९ ‘मुन्नाभार्इं’च्या दुकानांना टाळे

४९ ‘मुन्नाभार्इं’च्या दुकानांना टाळे

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाची कारवाई : नागरिकांच्या तक्रारीनंतर उचलली पावले; बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले

बीड : बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी विनापरवाना वैद्यकीय सेवा देऊन सर्वसामान्य रुग्णांची लुट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत ४९ मुन्नाभार्इंवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या दवाखान्यांना कुलूप ठोकले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात सर्वत्र पथके आक्रमक झाली आहेत. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
धारुर तालुक्यातील जहागीरमोहा येथे गुरुवारी बोगस डॉक्टरच्या दुकानावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.डी. शेकडे यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. येथील मुन्नाभाईने जमावाचा फायदा घेऊन पलायन केले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात धारुर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जहागीरमोहा येथील कारवाईनंतर अंबेवडगाव येथीलही मुन्नाभाईच्या दुकानावर अचानक छापा टाकला. मात्र, कुणकुण लागल्याने येथील मुन्नाभाईने दुकान बंद करुन पळ काढला. हाच धागा पकडून आरोग्य विभागाच्या आतापर्यंतच्या कारवायांचा आढावा ‘लोकमत’ने घेतला.
२००१ साली विनापरवाना वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर कारवाई संदर्भात शासन निर्णय निघाला. त्यानंतर आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांमार्फत अचानक छापा टाकून तपासणी करुन मुन्नाभार्इंवर गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कारवाया वाढल्याने आरोग्य विभागाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
बीड, माजलगाव, गेवराई आघाडीवर
बीडसह माजलगाव व गेवराई तालुक्यात बोगस डॉक्टरांवर सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. शिरुर तालुक्यात कारवायांचा आकडा शून्य आहे. बीड व माजलगाव प्रत्येकी ९, गेवराई ७, पाटोदा ५, धारुर ५, केज ४, आष्टी ४, वडवणी ३, अंबाजोगाई २ व परळी १ अशा कारवाया झालेल्या आहेत.
मादळमोहीत एकाच डॉक्टरवर तीनदा गुन्हा
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे अमोल यंदू हरेल विश्वास या बोगस डॉक्टरवर तब्बल तीन वेळेस गुन्हा दाखल झालेला आहे. तरीही तो कायदा झुगारुन गावात विनापरवाना वैद्यकीय सेवा देत आहे. अखेर आरोग्य विभागाने आता जिल्हाधिकाऱ्यांपुढे हा मुद्दा मांडला आहे. यावर काय कारवाई करायची याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 49 9 'Munnabhai' shops are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.